गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जुलै 2022 (08:13 IST)

गुजरातचे 5 जण अटकेत : लोणावळ्यात क्रिकेट मॅचवर सट्टा,

लोणावळा परिसरातील आपटे गावात क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणारे व जुगार खेळणाऱ्यांविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत गुजरातच्या पाच आरोपींना जेरबंद केल्याची माहिती बुधवारी दिली. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून 53 हजार रुपये, सहा मोबाईल फोन, एक टॅब, एक लॅपटॉप व पत्ते असा एकूण 2 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
अजय नटवरलाल मिठीया (वय 47), रवि रसिकभाई रजाणी (26), निपूल देवासीभाई पटेल (28), जिग्नेश गणेशभाई रामाणी (32) व मितेश रमेशभाई सिंधु (27, सर्व रा. राजकोट, गुजरात) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळयातील लेक मेन्शन नावाच्या बंगल्यात भारत विरुध्द इंग्लंड या ओल्ड ट्रफर्ड क्रिकेट स्टेडियम, इंग्लंड याठिकाणी खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावर एक बुकी ऑनलाईन पध्दतीने सट्टा घेत असल्याची माहिती एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांना मिळाली.