रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 9 मार्च 2023 (08:13 IST)

मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएतर्फे ही मोठी घोषणा

मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएतर्फे महिला दिनानिमित्त यंदा पहिल्यांदाच आंतर क्लब महिला क्रिकेट लीगचे आयोजन 8 मार्चपासून करण्यात आले आहे. महिला क्रिकेट लीगमध्ये 52 क्लब सहभागी झाले असून 780 महिला खेळाडूंंना स्पर्धेमधून क्रिकेटचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे.
 
मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त यंदा प्रथमच आंतर क्लब महिला क्रिकेट लीगचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय क्रिकेटला सध्या प्राप्त होत असलेलं ग्लॅमर आणि बीबीसीआयने (BCCI) नुकतंच सुरु केलेलं महिला आयपीएल, यामुळे ही महिला क्रिकेट लीग तरुण खेळाडूंसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म ठरु शकते.
 
या लीगमध्ये 52 क्लब सहभागी झाले असून 780 महिला खेळाडूंना या स्पर्धेमधून क्रिकेटचं कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लब विरुद्ध फोर्ट यंगस्टर्स यामधील उद्घाटनीय सामन्यातून मुंबईच्या क्रॉस मैदानातून या लीगला सुरुवात झाली. बीसीसीआयच्या सदस्या सुलक्षणा नाईक या सामन्याला उपस्थित आहेत.
 
प्रत्येक गटातील सामने चुरशीचे होणार!
एमसीए महिला क्रिकेट लीगमध्ये 52 महिला संघ 13 गटवारीमध्ये साखळी सामन्यांसाठी विभागले गेले आहेत. साखळी सामन्यांमधून गट-विजेता एकच संघ बाद फेरीत प्रवेश करणार असल्यामुळे प्रत्येक गटामधील सामने चुरशीचे होतील. मुंबईतील ऐतिहासिक अशा कांगा साखळी स्पर्धेने जसे भारताला अनेक दिग्गज क्रिकेटपटू दिले तशाच अनेक महिला क्रिकेट खेळाडू मुंबईला आणि पर्यायाने भारताला मिळावेत या हेतूने ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor