बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 23 फेब्रुवारी 2019 (09:04 IST)

आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द, शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत करणार

बारावी आयपीएल स्पर्धा 23 मार्चपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नेहमी गाजावाजा करीत पार पडतो. पण यावेळी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी होणार खर्च हा शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदतनिधी म्हणून देण्यात येणार आहे.
 
बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी ही माहिती दिली. प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय म्हणाले की, आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये जेवढा खर्च होतो, तो निधी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदतनिधी म्हणून देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होणार नाही.