IPL 2021: CSK vs RCB: RCB ला हरवून चेन्नई सुपर किंग्स अव्वल स्थानी पोहोचली

Last Modified रविवार, 26 सप्टेंबर 2021 (17:25 IST)
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या 35 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून चेन्नई सुपर किंग्स पुन्हा गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. शुक्रवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात CSK ने RCB चा 6 गडी राखून पराभव केला. या पराभवानंतरही आरसीबी तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. पण आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात 2 सामने गमावल्याने त्याचा नेट रन रेट प्रभावित झाला आहे. पहिल्या सामन्यात केकेआरकडून आरसीबीचा पराभव झाला. दुसरीकडे, CSK ने , IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करताना आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. केकेआर सध्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे.
गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स पाचव्या क्रमांकावर कायम आहे. पाच वेळा आयपीएल विजेते मुंबई इंडियन्स गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत. पंजाब किंग्स सातव्या तर सनरायझर्स हैदराबाद आठव्या स्थानावर आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्याबद्दल बोलावे तर चेन्नईने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी आरसीबीची शानदार सुरुवात केली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी झाली. विराटने 41 चेंडूत 53 धावा केल्या. पडिक्कलने आरसीबीसाठी 70 धावा केल्या.त्याच्याशिवाय डिव्हिलियर्सने 11, मॅक्सवेलने 11 धावा केल्या.आरसीबीने 20 षटकांत 6 गडी गमावून 156 धावा केल्या. चेन्नईकडून ड्वेन ब्राव्होने तीन तर शार्दुल ठाकूरने दोन मोठ्या विकेट्स घेतल्या.

157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता नाऋतूराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसिसने चेन्नईची शानदार सुरुवात केली. दोघांमध्ये 71 धावांची भागीदारी झाली. 157 धावांचे आव्हान चेन्नईने 18.1 षटकांत चार गडी गमावून पूर्ण केले. CSK कडून ऋतूराज गायकवाडने 38 आणि अंबाती रायुडूने 32 धावा केल्या. फाफ डुप्लेसिसने 31 धावा केल्या. सुरेश रैना नाबाद 17 आणि कर्णधार एमएस धोनीने 11 धावा केल्या. आरसीबीकडून हर्षल पटेलने दोन बळी घेतले. ड्वेन ब्राव्होला त्याच्या चमकदार कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

IPL 2021 Final: फाफ डुप्लेसिस आणि शार्दुल ठाकूर यांनी ...

IPL 2021 Final: फाफ डुप्लेसिस आणि शार्दुल ठाकूर यांनी चौथ्यांदा चेन्नईला चॅम्पियन बनवले, कोलकाताचा अंतिम फेरीत पराभव
चेन्नई सुपर किंग्सने (सीएसके) आयपीएल 2021 च्या अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्सचा ...

IPL 2021: कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी टी -20 क्रिकेटमध्ये ...

IPL 2021: कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी टी -20 क्रिकेटमध्ये खास तिहेरी शतक करण्यासाठी उतरेल
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनी जेव्हा इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 ...

टी -20 वर्ल्डकपसाठी अशी आहे भारतीय संघाची जर्सी

टी -20 वर्ल्डकपसाठी अशी आहे भारतीय संघाची जर्सी
टी -20 विश्वचषक सुरू होण्यास काही दिवस शिल्लक आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून पात्रता स्पर्धा ...

KKR vs DC Qualifier-2:दिल्ली कोलकाताचा प्रवास थांबवणार का ...

KKR vs DC Qualifier-2:दिल्ली कोलकाताचा प्रवास थांबवणार का ?प्लेइंग इलेव्हन अशी होऊ शकते
दोन वेळा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आयपीएल 2021 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये ...

कर्णधार म्हणून विराटचे आरसीबीला चॅम्पियन बनवण्याचे स्वप्न ...

कर्णधार म्हणून विराटचे आरसीबीला चॅम्पियन बनवण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले,विराट च्या नेतृत्वाखाली बंगळुरूची कारकिर्दी बद्दल जाणून घेऊ या
डेन ख्रिश्चनच्या गोलंदाजीवर एक धाव शाकिब अल हसनच्या बॅटमधून आली आणि त्यासह लाखो आरसीबी ...