यो-यो टेस्ट पास होण्याचे वरूणपुढे आव्हान

Varun Chakraborty
नवी दिल्ली| Last Modified सोमवार, 1 मार्च 2021 (12:44 IST)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना 12 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी चिंता वाढविणारी बातमी समोर आली आहे. एका वृत्तानुसार टी-20 मालिकेसाठी निवडलेला फिरकीपटू वरूण चक्रवतीने आतापर्यंत यो-यो टेस्ट पास केलेली नाही. त्यामुळे तो जर फिटनेस टेस्ट उत्तीर्ण होऊ शकला नाही तर त्याला या मालिकेतून बाहेर केले जाऊ शकते. 29 वर्षीय गोलंदाज चक्रवर्ती ऑस्ट्रेलिया दौर्यातसाठीही टी-20 संघात निवडला गेला होता. मात्र, पूर्णपणे तो तंदुरूस्त नसल्याने नंतर त्याच्या जागी टी नटराजनला संघात सामील करावे लागले होते. आता पुन्हा एकदा तो इंग्लंडविरूध्दच्या टी-20 मालिकेसाठी संघात निवडण्यात आला आहे. मात्र त्याने आतापर्यंत यो-यो टेस्ट पास केलेली नाही. याबाबत चक्रवर्तीने माध्यमांशी बोलताना सांगितले की, मला आतापर्यंत याविषयी कोणतीही माहिती दिली गेली नाही. भारतीय क्रिकेट संघात निवडल्यानंतर प्रथम यो-यो टेस्ट उत्तीर्ण होणे
गरजेचे आहे. या टेस्टमध्ये खेळाडूला 8.5 मिनिटात 2 किलोमीटर धावावे लागते किंवा आपला स्कोर 17.1 असा ठेवावा लागतो. वरूण चक्रवर्ती सध्या मुंबईत आयपीएलचा संघ कोलकाता नाइट राडर्ससोबत सराव करत आहे.

वरूणने तामीळनाडूसाठी 1 प्रथमश्रेणी सामना खेळला आहे. मात्र, तो विजय हजारे ट्रॉफीत संघाचा सदस्य नाही. तमिळनाडूच्या सिलेक्टरने वरूणविषयी सांगितले की, आम्ही त्याला टी-20 चा स्पेशालिस्ट खेळाडू मानतो. त्याच्याकडून चार किंवा पाच षटकांपेक्षा जास्त फलंदाजीची अपेक्षा ठेवली गेली नाही पाहिजे. कारण त्याच्या बोटांवर खूप दबाव असतो.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

चेन्नईची आज पंजाब किंग्जशी लढत

चेन्नईची आज पंजाब किंग्जशी लढत
आयपीएलमध्ये शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज आमने-सामने ठाकणार असून, पंजाब ...

दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून विराट कोहलीची निवड

दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून विराट कोहलीची निवड
भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विजडन ...

रोहित शर्माच्या बुटांची आयपीएलमध्ये चर्चा

रोहित शर्माच्या बुटांची आयपीएलमध्ये चर्चा
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएल स्पर्धेदरम्यान त्याच्या बुटांवरून देत ...

बंगळुरू-हैदराबादमध्ये आज झुंज

बंगळुरू-हैदराबादमध्ये आज झुंज
विजयाने सुरुवात करणार्यात विराट कोहलीच्या रॉंयल चॅलेंजर्स बंगळुरूचा इरादा आयपीएलमध्ये ...

कोलकाता-मुंबई यांच्यात आज चुरशीच्या लढतीची शक्यता

कोलकाता-मुंबई यांच्यात आज चुरशीच्या लढतीची शक्यता
आयपीएलमध्ये आज (मंगळवारी) पाचवेळचा विजेता असलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना दोनवेळचा ...