1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 21 फेब्रुवारी 2024 (11:27 IST)

विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना पुत्ररत्न 'अकाय' शब्दाचा अर्थ काय?

टीम इंडियाचा दमदार फलंदाज विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना पुत्ररत्न प्राप्ती झाल्याची बातमी विराटने नुकतीच दिली. ५ दिवसांपूर्वी म्हणजे १५ फेब्रुवारीला विराट-अनुष्का दुसऱ्यांदा आई-बाबा झाले.

विराट कोहलीने सध्या सुरु असलेल्या इंग्लंड विरूद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली होती. त्याचवेळी अनुष्का गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण विराटने याबाबत काहीही वाच्यता केली नव्हती. विराटचा जवळचा मित्र आणि दक्षिण आफ्रिकन माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स याबद्दल बोलला होता. पण इतके दिवस लपवून ठेवलेलं 'गोड गुपित' अखेर आज विराटने उघड केले. विराटने आपल्या मुलाचे नाव 'अकाय' असे ठेवले आहे.

अनुष्काने एका गोंडस मुलाला जन्म दिला. दोघांनीही एक निवेदन जारी करून ही आनंदाची बातमी दिली. ही बातमी मिळाल्यानंतर या दोघांवरही सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी आपल्या बाळाचे नाव अकाय ठेवले. याचा अर्थ जाणून घेऊया.
 
'अकाय' शब्दाचा अर्थ काय?
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहेत. अभिनेत्री तिच्या दुस-या बाळाला गरोदर असल्याचे सांगितले जात होते. या दोघांनीही याची पुष्टी केलेली नव्हती. काही काळापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर एबी डिव्हिलियर्सने एका मुलाखतीदरम्यान दोघांचे हे गुपित उघड केले होते. पण आज विराटने स्वत:हून हे गुपित उघड केले. विराटने आपल्या मुलाचे नाव अकाय ठेवले असून अकाय शब्द हा मूळ संस्कृत भाषेतला आहे. याचा स्पष्ट अर्थ म्हणजे शरीरहीन. ज्या व्यक्तीला शरीर नाही किंवा जो शरीरविरहित आहे, त्याला अकाय म्हणतात. अकाय शब्दाचा आणखी एक अर्थ म्हणजे आकार किंवा स्वरूप नसलेले म्हणजेच निराकार.
 
Edited By- Ratnadeep ranshoor