शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By wd|
Last Modified: रांची , सोमवार, 17 नोव्हेंबर 2014 (10:30 IST)

टीम इंडियाचा श्रीलंकेवर 'विराट' विजय

युवा फलंदाज विराट कोहलीच्‍या नाबाद शतकाच्या (139 धावा) जोरावर रविवारी जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकावर तीन गडी आणि आठ चेंडू राखून विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने श्रीलंकेचा सूपडा साफ करून 5-0 ने एकदिवसीय मालिका खिशात घातली.  श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेले 287 धावांचे आव्हान टीम इंडियाने सात विकेटवर 288 धावा केल्या. 
 
नाणेफेक जिंकून श्रीलंकाने प्रथम फलंदाजी करून भारताला 287 धावांचे आव्हान दिले होते. 
 
भारताच्या अवघ्या 64 धावांवर भारताचे दोन गडी बाद झाल्यामुळे संघात अस्वस्थता पसरली होती. मात्र, कोहलीने 'विराट' खेळीच्या जोरावर श्रीलंकेच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला सामना खेळणारा केदार जाधव याने 20 धावा केला. मेंडीसने त्याला क्लिनबोल्ड केले. बिन्नी आणि आर. आश्विन यांनाही मेंडीस यानेच तंबूत पाठवले. 
 
अजिंक्य रहाणे (2 धावा) लवकरच बाद झाला होता. अजिंक्यला मॅथ्यूजने क्लिनबोल्ड केले. गेल्या सामन्यात वर्ल्डरेकॉर्ड करणारा रोहित शर्मा यालाही आज काही विशेष करता आले नाही. 
 
श्रीलंकेकडून कर्णधार अँजेलो मॅथ्यूज याने याने शतकीय खेळी केली. लाहिरू थिरमानेच्या 52 धावा केल्या. भारताकडून धवल कुलकर्णीने तीन, अक्षर पटेल आणि आर. आश्विनने प्रत्येकी दोन गडी बाद केले.