शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

डेअरडेव्हिल्स विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी खेळणार

WD
गेल्या दोन सामन्यांत सहज विजय नोंदवून आत्मविश्‍वास दुणावलेला दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ उद्या डेक्कन चार्जर्सविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक साजरी करण्याच्या तयारीत आहे. याउलट डेक्कनने खातेही उघडलेले नाही. सेहवागच्या नेतृत्वाखालील दिल्लीने धोनीचा चेन्नई आणि चॅम्पियन लीगविजेता मुंबई इंडियन्सला नमविले. त्यामुळे आज त्यांनाच विजयाचा प्रबळ दावेदार मानले जाते.

दुसरीकडे कुमार संगकाराच्या नेतृत्वाखालील डेक्कन संघातील गोलंदाज धावा तर काढतात; मात्र गोलंदाज अपयशी ठरत असल्याने विजय पदरी पडत नाही. दिल्लीची फलंदाजी तगडी आहे. सेहवाग, पीटरसन, माहेला जयवर्धने, रॉस टेलर हे चारही आक्रमक फलंदाज काही षटकांतच सामन्याचे चित्र पालटतात. याशिवाय यष्टिरक्षक नमन ओझा, अष्टपैलू इरफान पठाण, योगेश नागर, अजित आगरकर हे तळाच्या स्थानाला भक्कम करतात. दिल्लीच्या विजयात गोलंदाजांची भूमिकाच मोलाची ठरली. त्यांनी चेन्नईला ११0 तर मुंबईला ९२ धावांवर रोखले होते. मोर्ने मोर्केल याने ९, उमेश यादवने ४ सामन्यांत ५ तर फिरकीपटू शहाबाज नदीम याने ३, पठाणने २ आणि आगरकरने एकाच सामन्यात २ गडी बाद केले. चार्जर्सची चिंता मात्र गोलंदाजांमुळे वाढली. हे गोलंदाज चांगल्या धावसंख्येचा बचाव करू शकले नाहीत. डीनिल ख्रिस्टियनच्या अखेरच्या षटकात मुंबईने १८ तर राजस्थानविरुद्ध ३.४ षटकांत त्यांनी ५५ धावा दिल्या. डेल स्टेन, आनंद राजन, ख्रिस्टियन आणि अंकित शर्मा हे अपयशी ठरले होते. अमित मिश्राने मात्र रॉयल्सविरुद्ध ३ गडी बाद केले होते. दिल्ली संघ डेक्कनच्या तुलनेत संतुलित वाटतो. कुणी जखमी झाले नसेल तर यापूर्वीचाच संघ खेळेल असे दिसते.