शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 जुलै 2016 (17:19 IST)

नाराज रवी शास्त्रींचा 'आयसीसी'च्या समितीतून राजीनामा

नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड न झाल्याने नाराज रवी शास्त्री यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेटविषयक समितीतील माध्यम प्रतिनिधीपदाचा राजीनामा दिला. उल्लेखनीय आहे की अनिल कुंबळे या समितीचेही अध्यक्ष आहेत.
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री उत्सुक होते. बीसीसीआयने प्रशिक्षकपदाच्या निवडीसाठी सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या दिग्गज खेळाडूंची समिती नेमली होती. या समितीने सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या पण शास्त्रींच्या मुलाखतीवेळी गांगुली उपस्थित नव्हते. नंतर कुंबळे यांची निवड करण्यात आली. यावरून शास्त्री प्रचंड नाराज झाले. 
 
गांगुली यांच्याशी असलेल्या वादांमुळे प्रशिक्षक म्हणून निवड झाली नाही, असे वक्तव्य शास्त्री यांनी केले होते. या सर्व प्रकरणामुळे कुंबळे अध्यक्ष असलेल्या क्रिकेटविषयक समितीतून बाहेर पडण्याचा मार्ग रवी शास्त्री यांनी निवडला.