शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: कोलकाता , शनिवार, 19 मार्च 2016 (10:34 IST)

पाकला विराटचा धसका

टीम इंडिया टी20, विश्व कप, सेमीफायनल, भारत, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, श्रीलंका, दक्षिण 
 
आफ्रिका, Team India, T 20 World Cupएकेकाळी विश्वचषक, पाकिस्तान आणि सचिन तेंडुलकर यांचे गहिरे नाते असायचे. पाकिस्तानी गोलंदाजीवर जोरदार हल्ला करून भारताच्या विजयात योगदान देणार्‍या सचिनच्या खेळी या क्रिकेटरसिकांच्या स्मृतिपटलावर आजही ताज्या आहेत. 
 
सचिन आणि शोएब अख्तर यांच्यातली मैदानावरील ‘ठस्सन’ पाहाणे, हा क्रिकेटमधील अत्युच्च आनंददायी अनुभव असायचा. सचिनच्या निवृत्तीनंतर त्याचे हेच स्थान आता विराट कोहलीने घेतले आहे. भारताचे माजी संघनायक सुनील गावसकर यांनी म्हटले होते की, सचिनचे सर्व विश्वविक्रम एक भारतीय क्रिकेटपटूच मोडू शकेल. भारतीय संघातील विराटकडे ही क्षमता आहे. गावसकर यांचे बोल आता खरे ठरू लागले आहेत. विराट तेजाने तळपू लागला आहे. कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 या तिन्ही प्रकारामध्ये तो आपल्या अभिजात फलंदाजीचा ठसा उमटवू लागला आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर 19 मार्च रोजी होणार्‍या लढतीत पाकिस्तानला सर्वात मोठा धोका हा विराटपासून असणार आहे. याचे कारण म्हणजे ‘विश्वचषक, पाकिस्तान आणि विराट’ हे निर्माण झालेले नवे समीकरण.