1. वृत्त-जगत
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 21 मे 2015 (10:34 IST)

ई-सिगारेट्समुळे फुप्फुसांची होतेय हानी

सिगारेटची सवय सोडण्यासाठी ई-सिगारेटचा सर्रास वापर केला जातो.. पण, ई-सिगारेटचाही वापर तुमच्या फुप्फुसावर वाईट परिणाम करतात, असा खुलासा नुकत्याच झालेल्या एका संशोधनात झालाय. 
 
ई-सिगारेटमध्ये वेगवेगळे फ्लेवर्स तयार करण्यासाठी वापरात येणारे पदार्थ तुमच्या फुप्फुसांच्या कार्यप्रणालीवर गंभीर परिणाम करू शकतात. हे संशोधन करणार्‍या संशोधनकत्र्यांनी 13 फ्लेवर्सचं परीक्षण केलं. त्यातील पाच फ्लेवर्सचा फुप्फुसांवर वाईट परिणाम दिसून आलाय. या शोधाच्या मुख्य लेखिका अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठाच्या चेंपरेंस रोवेल यांच्या म्हणण्यानुसार, ई-सिगारेटमधून निघणार्‍या धुरामध्ये असलेली वेगवेगळ्या रसायनांचा फुप्फुसांवर होणार्‍या वाईट परिणामांबद्दल वापरकत्र्यांना माहितीच नसते. यामध्ये ई-सिगारेटचा वापर किती प्रमाणात होतो, हे पाहणंदेखील महत्त्वाचं आहे. अध्ययनात कृत्रिम मानव फुप्फुस ई-सिगारेटच्या 13 फ्लेवर्सच्या संपर्कात जवळपास 30 मिनिटे किंवा 24 तासांपर्यंत ठेवण्यात आलं. 
 
सुगंधित ई-सिगारेट दिसायला आणि वापरायला सोपे असले तरी त्यांच्याबद्दल वापरकत्र्यांना पूर्ण माहिती हवी. यामुळे, स्वास्थ्याला होणारा धोका आणि त्यामागची कारणं यांचा प्रसार करणं खूपच गरजेचं आहे, असं रॉवेल यांचं म्हणणं आहे. हे संशोधन डेनवरमध्ये झालेल्या अमेरिकन थोरासिक सोसायटी इंटरनॅशनल कॉन्फ़रन्समध्ये सादर करण्यात आलं.