बुधवार, 25 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

दोन तोंडाचे वासरू

अमेरिकेतील केंटुकीमधील एका शेतकर्‍ाच गाईने चक्क दोन तोंड असलेल वासराला जन्म दिला आहे. या वासराचे तोंड एकमेकांपासून विरुध्द दिशेला असून ते अशा पध्दतीने जुळलेले आहे की त्यांना एकूण तीन डोळे आहेत. 
 
गाय वासराला जन्म देत असताना मालकाने पाहिले असता त्याला वाटले की गाय जुळ्या वासरांना जन्म देत आहे, परंतु नंतर त्याच्या लक्षात आले की गाय दोन तोंड असलेल्या एकाच वासराला जन्म देत आहे.
 
ही बातमी आजूबाजूच परिसरात वार्‍यासारखी पसरली व सर्वानी या वासराला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. काही दिवसांपूर्वी या वासराचा जन्म झाला असून या वासराला नीट चालत येत नसल्याचे त्याच्या मालकाने सांगितले आहे. 
 
ते स्वत:भोवती घिरटय़ा घेत जमिनीवर कोसळते अशी माहिती त्याने दिली आहे. असा प्राणी जन्माला येणे व तो दीर्घ काळ एक प्रकारे चमत्कार आहे. म्हणूनच वासराचे नाव आम्ही लकी ठेवल्याचे वासराच्या मालकाने सांगितले असा प्राणी, जन्मानंतर अशक्त असतो व तो जास्त काळ जगू शकत नाही. 
 
परंतु गायीचे हे वासरू आपल दोन्ही तोंडांनी खाते व त्याची तब्बेतदेखील सदृढ असल्याचे या कुटुंबाने सांगितले आहे.