1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

मुंग्यांही टॉयलेटला जातात

काय आपल्या वाटतं की मुंग्यांचं आपले टॉयलेट असू शकतं. आश्चर्य पण सत्य आहे की मुंग्या एका ठराविक जागेवरच मल विसर्जन करतात. 
 
जर्मनीतील युनिव्हर्सिटी ऑफ रेजेनबर्ग येथील संशोधकांनी सांगितले की मनुष्याप्रमाणे मुंग्यांसाठीही स्वच्छता हा एक मुख्य मुद्दा आहे. अध्यनात ही गोष्ट समोर आली की पांढर्‍या रंगाच्या प्लास्टर घरट्यांमध्ये राहणार्‍या मुंग्या एका ठराविक जागेवर शौच करतात.
 
संशोधकांनी मुंग्यांना रंगीन पदार्थ खाऊ घालून त्यांच्या घरट्यांवर नजर ठेवली. तर पाहिले की एका कोपर्‍यात त्याचे अंश अर्थात मुंग्यांचे मळ जमा होते, याचा अर्थ त्या घरट्यात राहणार्‍या सर्व मुंग्या ठराविक कोपर्‍याचा वापर शौचालय म्हणून करतात.
 
मनुष्याप्रमाणे मुंग्यांमध्ये स्वच्छतेची आवड असल्याची आढळून आले कारण त्या आपले घरटे स्वच्छ ठेवत असून कचरा बाहेर काढतानाही दिसल्या.