1. वृत्त-जगत
  2. आज-काल
  3. मंथन
Written By wd|
Last Modified: भोपाळ , मंगळवार, 22 जुलै 2014 (18:16 IST)

र.वि. शिरढोणकर स्मृती समारोह संपन्न

संघर्षाची प्रतिमूर्ती होते रघुनाथ राव शिरढोणकर: श्री धर्माधिकारी 
 
‘‘श्री रघुनाथ राव शिरढोणकर प्रामाणिक पत्रकार होते. त्यांनी एक उदाहरण प्रस्तुत केले होते. त्यांचे पत्र ‘हितचिंतक’चा ‘पानीपत अंक’ आजही मैलाचा दगड बनलेला आहे.’’ हे उद्गार होते श्री वि. गो. धर्माधिकारी यांचे. ते दुष्यन्त कुमार स्मारक पाण्डुलिपि संग्रहालयाच्या शिरढोणकर सभागृहात आयोजित र.वि.शिरढोणकरस्मृती समारंभात मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. 
 
समारंभात वरिष्ठ पत्रकार श्री अभिलाष खाण्डेकर यांना र.वि.शिरढोणकर स्मृती सन्मान देण्यात आला. श्री अभिलाष खाण्डेकर यांनी आपल्या अभिनंदनाच्या उत्तरात म्हटले की या सन्मानाची जबाबदारी अधिक वाढली आहे. त्यांनी शिरढोणकर यांच्या पत्रकारितेचा उल्लेख करून पत्रकारितेच्या मूल स्वरूपाला रेखांकित केले. 
 
या प्रसंगी ‘हितचिंतक’च्या ‘पानीपत अंका'ता पुनर्मुद्रित अंक आणि र.वि.शिरढोणकरयांच्या पाण्डुलिपिच्या डिजीटल स्वरूपाचे लोकार्पण करण्यात आले. 
 
समारंभाच्या दुसर्‍या सदरात इंदूर निवासी वरिष्ठ रंगकर्मी श्री श्रीराम जोग यांच्या एकलंअभिनयाची प्रस्तुती ‘असेच काही तरी’ (ऐसे ही कुछ भी) याचे कौतुक करण्यात आले.