'इंडियन' मोटरसायकिल आता भारतात
- भीका शर्मा
इंडियन मोटरसायकिल नाव एकूण अस वाटत असेल की हे एक भारतीय मोटरसायकिल ब्रँड आहे. पण असे नाही आहे, 'इंडियन' विदेशी रस्त्यांवर धावणारी शानदार सुपरबाईक निर्माता कंपनी आहे. फक्त याचे नाव इंडियन आहे पण ही एक अमेरिकन कंपनी आहे. इंडियन मोटरसायकिलची नीव सन 1901मध्ये ठेवण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत बरेच चढ उतार बघितल्यानंतर कंपनीने क्रूझ बाइक सेग्मेंटमध्ये एकापेक्षा एक शानदार बाइक्स बाजारात आणल्या आहेत. भारतीय बाजारात या ब्रँडला आणायचे आहे अशी चर्चा बर्याच दिवसांपासून सुरू होती. याच क्रमात पोलारिस इंडस्ट्रीजने या मोटरसायकिलला भारतात लाँच केले आहे. अमेरिकन ब्रँड इंडियन मोटरसायकिलने भारतीय बाजारात आपल्या तीन नवीन बाइक्स चीफ क्लासिक, चीफ क्लासिक विंटेज आणि चीफ्टेनची लाँचिंग केली आहे.
कंपनीने या तिन्ही सुपर क्रूजर बाइक्सच्या किमती देखील बाजारात जारी करण्यात आल्या आहेत. इंडियन मोटरसायकिलांना भारतात सध्या सीबीयू रूटच्या माध्यमाने आणले आहे ज्यात यांची किंमत 26.5 लाख रुपये ते 33 लाख रुपयांपर्यंत आहे. इंडियन चीफ क्लासिकची किंमत 26.5 रुपये ठेवण्यात आली, जेव्हा की चीफ विंटेजची किंमत 29.5 लाख रुपये आहे. तसेच याच्या रेंजमधील सर्वात महागडी बाइक चीफटेनची किंमत 33 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.