मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

चार वर्षांच्या चिमुकलीने आतापर्यंत वाचली 1 हजार पुस्तके

एक अशी मुलगी जॉर्जियामध्ये आहे जी फक्त 4 वर्षांची असून तिने आतापर्यंत एक दोन नव्हे तर तब्बल 1 हजार पुस्तके वाचली आहेत. या मुलीचे नाव डालिया असे असून तिने वॉशिंग्टनच्या काँग्रेस ग्रंथालयात एक दिवसीय ग्रंथपाल म्हणूनही भेट दिली.
 
ही चार वर्षांची चिमुकली एवढी पुस्तके वाचू शकते यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता पण तिच्या आईने तिचा एक पुस्तक वाचताना व्हिडिओही शेअर केला. तिच्या आईने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत डालिया ही अडीच वर्षांची असल्यापासून पुस्तक वाचत असल्याचे सांगितले.
 
लहान मुलांमध्ये पुस्तकाप्रती जास्तीत जास्त आवड निर्माण व्हावी म्हणून डालियाच्या आईने तिला पुस्तके वाचण्याच्या क्लासमध्ये घातले. या क्लासमध्ये आतापर्यंत तिने एक हजारांहून अधिक पुस्तके वाचली असल्याची नोंद आहे.
 
वॉशिंग्टनमधील काँग्रेस ग्रंथालयात तिच्याकडील या कौशल्यामुळे तिला एक दिवसीय ग्रंथपाल होण्याचा मानही मिळाला. तेथील ग्रंथपाल कार्ला हेडन यांनी या मुलीसोबत आपला फोटो ट्विटरवर शेअर केला. छोट्या ‍डालियासोबत एक दिवस काम करून मला खूप आनंद झाला अशा प्रकारचे ट्विट त्यांनी केले.