मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : शुक्रवार, 4 ऑगस्ट 2023 (12:25 IST)

ज्युलियस रॉबर्ट ओपेनहायमर: ''अणुबॉम्बचे जनक''

“आम्हाला माहित होते की जग पहिल्यासारखे नाही राहणार.... ”
 
आपण कोणाला वैज्ञानिक म्हणतो? त्या व्यक्तीला ज्याला विज्ञानाची समझ असते ? पण ही समझ केवळ विज्ञानापुरता नव्हे तर त्याचा वापर कसा करावा ह्यासाठी देखील असायली पाहिजे.
 
एकीकडे जिथे पृथ्वीवर राहणारे चंद्रावर पोहचू शकतात तिथे ह्याच पृथ्वीवर राहणारे व्यक्तींना नष्ट कारण्याचा सामर्थ्य देखील ठेवतात. ही गोष्टी केवळ वाक्य जड बनवण्यासाठी नव्हे तर ह्याचा उदाहरण जगाने 'हिरोशिमा' आणि 'नागासाकी' ह्याच्यावरती झालेले अणुबॉम्ब प्रहार या स्वरूपात बघितलं आहे.
 
युनाइटेड स्टेट्सच्या न्यूयॉर्क शहरात 22 एप्रिल 1904 साली जुलियस रॉबर्ट ऑपनहाईमर, ह्यांचा जन्म झालं होता. ह्यांचे वडील जर्मनीपासून स्थानांतरित झालेले यहुदी होते. जुलियस रॉबर्ट ऑपनहाईमर हे एक अमेरिकी सैद्धांतिक भौतिकशास्त्री होते. त्यांच्याजवळ अनेक शैक्षणिक पदव्या होत्या जसे रसायनशास्त्रात बॅचलर डिग्री, भौतिकशास्त्रात पी.एच.डी इ. ह्यांनी पूर्व तत्त्वज्ञानाची शिक्षा देखील घेतली होती.
 
दुसऱ्या विश्व युद्धात ह्यांच्या योगदानानंतर जग ह्याचं नाव कधीही विसरले नाही. दुसऱ्या विश्व युद्धच्या काळात वर्ष 1942 मध्ये जुलियस रॉबर्ट ऑपनहाईमर ह्यांना मॅनहॅटन प्रोजेक्टचं संचालक बनवण्यात आलं. 'मॅनहॅटन प्रोजेक्ट' ह्याचा एकमात्र उद्देश अणुबाँब बनवायचं होतं.
 
जर्मनीच्या पोलंडवर आक्रमण झाल्यानंतर विश्व युद्धात आणखीन वातावरण तापले आणि फलस्वरूपात जर्मनी आणि अमेरिका ह्यांच्यामध्ये अणुबॉम्ब बनवण्याची होड सुरु झाली. ब्रिटिश आणि अमेरिकेचे अणुबॉम्ब बनवायच्या सहप्रयत्नांना 'मॅनहॅटन प्रोजेक्ट' नाव दिलं गेलं आणि ह्यासाठी जुलियस रॉबर्ट ऑपनहाईमर ह्यांना नियुक्त केलं गेलं.
 
1943 साली अणुबॉम्ब बनवण्याच्या ह्या कार्यासाठी त्यांनी लॉस अलमॉस तिथलं एक टापू ठरवलं आणि 16  जुलै सॅन 1945 रोजी ट्रिनिटी साइट जवळ पहिलं यशस्वी परमाणू परीक्षण केलं.
 
युद्ध संपल्यानंतर वर्ष 1947 - 1952 पर्यंत जुलियस रॉबर्ट ऑपनहाईमर, ह्यांना ऍटोमिक एनर्जी कमिशन (AEC), सामान्य सल्लागार समितीचे अध्यक्ष बनवलं गेलं. त्या समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांनी 'हायड्रोजन बॉम्ब' बनवण्याच्या प्रस्तावाचा विरोध केला, कारण त्यांना माहित होता की हा अणुबॉम्बपेक्षा जास्त विनाशकारी होईल.
 
ऑपनहाईमर ह्यांना भविष्यात आण्विक युद्धामुळे होणार्‍या विनाशाबद्दल अधिक काळजी होती, हेच कारण होते की त्यांनी 'हायड्रोजन बॉम्ब' ह्याच्या निर्माणाचं विरोध केलं.
 
1953 साली त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा संदर्भात 'अप्रामाणिकपणा' चे आरोप लावले गेले. त्यांना भूतकाळात कम्युनिस्टांशी संबंध ठेवण्याच्या आरोपात सोव्हिएत एजंट्सचे नाव देण्यास विलंब केल्यास आणि हायड्रोजन बॉम्बच्या निर्मितीला विरोध केल्याच्या आरोपात ‘सेक्यूरीटी कलेअरन्स’(राष्ट्रीय सुरक्षा माहितीचे प्रवेशासाठी पात्रता) परत घेण्यात आलं. चौकशीनंतर हे सगळे आरोप नाकारले गेले.
 
1963 मध्ये राष्ट्रपती लिंडन बी. जॉन्सन ह्यांनी जुलियस रॉबर्ट ऑपनहाईमर, ह्यांना AEC ह्यांच्याकडून 'फर्मी अवॉर्ड' देण्यात आलं. 18 फेब्रुवारी 1967 रोजी ऑपनहाईमर ह्यांचे घशाच्या कर्करोगाने निधन झाले.
 
विकासाचा आशय फक्त विज्ञानाची प्रगती मात्र नव्हे तर एक-एक व्यक्ती, अस्तित्वात असलेलं कुटुंब, समुदाय, देश किंवा जगाचे विचारधारा आणि सिद्धांताचे विकास देखील व्हायला पाहिजे. वैज्ञानिक विकास माणसांचे प्रगतीमुळे असतात, हे विकास देखील विनाशक होऊन जाईल तर या प्रगतीचे काय महत्व?
 
- हर्षिता बारगल