शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020 (13:39 IST)

चांगले संस्कार प्राथमिकता असावी

असे म्हणतात की मुलं हे पालकांचे प्रतिबिंब असतात. मुलांमध्ये संस्काराचा विकास नेहमी मोठ्यांना बघूनच होतो म्हणून मोठ्यांना हवे की नेहमी आपले वागण्याकडे तेवढेच लक्ष ठेवायचे असतं जेवढं मुलांकडे. असे म्हणतात की चांगले खत पाणी दिले की रोपटं सुंदर येत आणि आपले संस्कार देखील याच प्रमाणे काम करतात. असे बघण्यात येते की एखाद्या मुलाच्या वाईट सवयी बघून लोक नको ते बोलतात त्याचा संस्काराबद्दल बोलले जाते. की याला संस्कार चांगले मिळाले नाही. 
 
संस्कारांना मुलांवर बळजबरीने लादता येत का किंवा मुलांना वही-पेन देऊन पाठांतर करवता येऊ शकत का? 
जेव्हा मुलगा गोष्टींना समजू जाणू लागतो तेव्हापासून त्यामध्ये सवयी विकसित होऊ लागतात. अशा परिस्थितीत, हे लक्षात ठेवावे की आपल्या अति लाड आणि प्रेमामुळे आपले संस्कार मुलांपासून लांब तर होत नाहीये. 
 
मुलांच्या संगोपनासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे -
 
आज तंत्रज्ञानात बालपण विरघळत आहे. आजची मुलं सगळे काम बोटाच्या मदतीने करतात जसे की प्लेयरवर गाणी ऐकणं, कॉम्पुटर वर खेळ खेळणं, टीव्ही बघणं, फेसबुक चालवणं, व्हाट्सअ‍ॅप चालवणं आणि बरेच काही.... आजच्या मुलांचा संपूर्ण वेळ इंटरनेट वर जातो. त्यांना हे समजत नाही की काय चूक आहे काय बरोबर. ते तर तेच शिकतात जे त्यांना दिसत. म्हणून मुलांच्या हाती तांत्रिक खेळणं देण्यापूर्वी त्यांना समजावणे फार महत्त्वाचे आहे.
 
आपल्या मुलांच्या क्रियाकलापावर लक्ष द्या. आजच्या व्यस्त आणि धावपळीच्या जीवनात आई वडील दोघेही काम करत आहे, मुलांच्या प्रत्येक क्रियेकडे त्यांना लक्ष देणं अवघड झाले आहे. आपण कामानिमित्त घराच्या बाहेर असला किंवा घरात, मुलांना मनमानी करू देऊ नका. त्यांना आपल्या संमतीनेच काही काम करण्याची सवय लावा.
 
सर्वात महत्त्वाचे आहे आपल्या मुलांना समजून घेणं आणि त्यांचा दृष्टीकोनातून गोष्टी बघणं. आपल्या मुलांशी त्यांच्या काम, मित्रांबद्दल संवाद करा. कम्युनिकेशन गॅप सर्वकाही खराब करू शकत. जेव्हा आपण त्यांचा दृष्टीकोनातून बघता तेव्हाच त्यांच्या भाषेत त्यांना समजवू शकाल.
 
काही लोक आपल्या मुलांना सर्व काही पुरवण्याच्या आग्रहाने त्यांची कायदेशीर आणि बेकायदेशीर मागणी पूर्ण करतात, ज्यामुळे त्यांच्यात कोणत्याही किमतीत काहीही मिळवण्याची प्रवृत्ती विकसित होते. असे करताना पालक हा विचार करत नाही की ते आपल्या मुलांना फक्त घेणंच शिकवत आहे देणं नाही.