मुंबईतील विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये राहणाऱ्या चेतन राऊत या तरूणाने सुंदर कलाविष्कार बनवला आहे. त्याने तब्बल 75 हजार गाण्याच्या सिडीचा वापर करुन छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती साकारली आहे. 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून त्याने ही कलाकृती साकारण्यास सुरुवात केली आणि तब्बल 48 तासानंतर त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती पूर्ण केली. चेतन राऊत हा जे जे स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी आहे. दरम्यान सीडी पासून तयार करण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठी प्रस्ताव पाठण्यात आला.