सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (08:41 IST)

जागतिक मुद्रण दिवस 2021 विशेष : मुद्रण दिन आणि त्याचे महत्त्व

दर वर्षी 24 फेब्रुवारी 'जागतिक मुद्रण दिवस 'म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मुद्रणकलेचे जनक योहान्स गुटेनबर्ग ह्यांच्या जन्मदिनाप्रीत्यर्थ साजरा करण्यात येतो. गुटेनबर्ग ह्यांनी मुद्रण कलेचा शोध लावला म्हणून आज आपण वैचारिक दृष्टया समृद्ध आहोत. मुद्रण पद्धतीचा शोध चीनमध्ये लावला गेला.त्या काळी उपकरणे म्हणून कागद, शाई आणि मुद्रण प्रतिमा हेच वापरण्यात येत होते. कोरीव मजकुरावर शाई लावून त्यावर ओलसर कागद ठेवून मुद्रणाचा ठसा उमटवायचे. या मध्ये धार्मिक मजकूर लिहायचे .
 
 जर्मनींतील गुटेनबर्ग यांनी अक्षराचे सुटे खिळे बनविण्याचा शोध लावला.तसेच टाईपसह छपाई यंत्राचा शोध देखील गुटेनबर्ग यांनी लावला. बायबल या ग्रंथाची छपाई करणारे देखील गुटेनबर्ग होते. इ.स. 1434 ते 1439 हा काळ मुद्रण क्षेत्रासाठी महत्वाचा काळ होता या काळातच गुटेनबर्गांनी 'धात्वलेखी मुद्रणाचा शोध लावला. या मुद्रणेच्या पद्धतीमध्ये खूप अडचणी आल्या. अक्षरे वाकडे दिसायचे.ह्यांचा मूळ व्यवसाय चांदीचा असून यांनी योहान फुष्ट ह्यांच्या समवेत मुद्रणाचा व्यवसाय सुरू केला. 
भारतामध्ये मुद्रण कला 1556 साली आली सर्वप्रथम गोव्यात पुर्तगाल मधून छापखाना जहाजाने आला. या तंत्राने लोकांमध्ये धर्मांतर करण्याचा मुख्य हेतू होता. 
महाराष्ट्रात ही कला 1882 साली आली अमेरिकन मिशेन ने या मुद्रणाची सुरुवात केली या साठी त्यांनी श्रीरामपुरातून देवनागरी लिपीचे खिळे आणले या मुद्रणालयात काम करणारे टॉमस ग्रॅहम मातृका तयार करण्यास शिकले त्यांनी देवनागरी आणि गुजराती चे सांचे बनवून मातृका तयार केल्या.
त्यांच्या कडून गणपत कृष्णाजी पाटील हे अमेरिकन मिशन चे होते मातृका बनविण्यास शिकले आणि स्वतःचे मुद्रणालय 1827 रोजी सुरू केले. पाटीलांनी चुनखडा वरून समपृष्ठ छपाई केली आणि तंत्राची निर्मिती करून पंचांगाची छपाई केली. अक्षर मुद्रणालय देखील त्यांनी सुरू केले. 
मुद्रण कलेचा विकास झाल्यावर संगणकावरून कमांड देऊन मुद्रण तंत्र विकसित झाले. त्यामुळे मुद्रण कमी वेळात पूर्ण होणे शक्य झाले. कालांतरानंतर इंटरनेटचा विकास झाला आणि मीडिया विकसित झाला. त्यामुळे आपण सहजरित्या टाईप करू शकतो. हे सर्व शक्य झाले या संशोधकामुळे. मुद्रण कलेचे जनक योहान्स गुटेनबर्ग यांना मानाचा मुजरा.