शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By

चातुर्मास पौराणिक कथा, ही कथा ऐकल्यानेही महापापाचा नाश होतो

मांधाता नामक एका चक्रवर्ती सम्राटाची ब्रह्मांडपुराणातील कथा या संदर्भात सांगितली जाते. नारदाने विचारले, 'पित्या ब्रह्मदेवा, आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे? व तिचे माहात्म्य काय ते मला सांगा कारण मला विष्णूची आराधना करायची आहे?' ब्रह्मदेव म्हणाले, कलियुग आवडणार्‍या मुनिश्रेष्ठा, तू चांगले विचारलेस. तू खरोखरच वैष्णव आहेस. त्रैलोक्यामध्ये एकादशीसारखे दुसरे पवित्र व्रत नाही. हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करते, व सर्व इच्छा पूर्ण करते. ज्या माणसांनी जन्माला येऊन हे व्रत केले नाही, त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे. आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्मा किंवा शयनी या नावाने प्रसिद्ध आहे. हृषिकेशाच्या प्रीतीकरता या एकादशीचे उत्तम व्रत जरूर करावे. आता मी तुला या एकादशीची पुराणातील कथा सांगतो. ही कथा ऐकल्यानेही महापापाचा नाश होतो.



या एकादशीचे माहात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. याप्रमाणे ब्रह्मांडपुराणातील पद्मा एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले.