शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

जलद वाचनाचे तंत्र

विद्यार्थी मित्रांनो, सध्या परिक्षेचा मोसम सुरू आहे. बहुतांश अभ्यासक्रम संपलेले आहेत. याचा अर्थ आपणास सं‍बंधित विषययांचे प्रश्न वाचल्यावर त्वरीत स्मरण होणे आवश्यक आहे. विषय समजलेला असला तरी काही प्रमाणात विस्मरण होत असते. त्यासाठी वारंवार वाचणे सराव आवश्यक असते. शिक्षण तज्ञांनी अशा स्थितीत फास्ट रिडींग मेथड या वापर करण्याचे सुचविले आहे.
 
या पद्धतीचे वैशिष्ट म्हणजे शब्द न शब्द वाचून काढणे आवश्यक आही. या पद्धतीला मानसशास्त्रीय बैठक आहे. या पद्धतीमुळे कमी वेळात जास्त वाचन करणे शक्य होते त्यामुळे मनालाही थकवा कमी येतो आणि वेळेचीही बचत होते. विशेषत: ही पद्धत भाषा विषय, संदर्भग्रंथ यासाठी उपयुक्त ठरते.
 
परंपरागत पद्धतीनुसार आपण पूर्ण ओळ न ओळ वाचत असतो. परंतू आपणास संबंधित विषयाचे पुर्वज्ञान असल्यामुळे तसे वाचणे आवश्यक नाही. आपणास नजरेने मौनपणे वाचन करावयाचे आहे. प्रत्येक प्रश्नात पेरिग्राफ असतात. प्रत्येक परिच्छेद मध्ये एक मुद्दा असतो. आपण प्रत्येक ओळीतील पहिले मधले शेवटचे शब्दावरून नजर फिरवायची.
 
परिच्छेद संपला की काही सेकंद थांबले की मनात शब्दाची जुळवाजुळव होऊन जाते. आपणास तसे कळते ही सुरूवातीला थोडा गोंधळ होतो पण प्रयत्न सोडू नका. थोडा सराव झाला की आता प्रत्येक ओळीतील फक्त मधला शब्द वाचायचा तसे सर्व समजून जाते. मार्कही कमी पडणार नाही.
 
या पद्धतीने एखाद्या प्रश्नाचे उत्तर वाचवयास तीस मिनीटे लागत असतील, तर आता 10-15 मिनीटच लागतात. सरावसाठी ही पद्धत उपयुक्त आहे.
 
मित्रांनो, परीक्षेला जाण्यापूर्वी मुद्याचे स्मरण करा, व्याख्या वाचा, आकृती, आलेखाचा सराव करा आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा, यश तुमचेच आहे.
 
- प्रा. अशोक श्री सारडा