1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
  4. wonderful Marathi language

आपली विलक्षण मराठी भाषा

marahti rajbhasha diwas
आपल्या मराठीत असे काही शब्द आहेत ज्यांचा साधारणपणे अर्थ तोच असतो पण तरीही ते वेगळा अर्थ सांगून जातात. असा हा गम्मतशीर प्रयत्न- 
 
रस्ता - मार्ग
* जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता.
* जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग.
 
खरं - सत्य
* नेहमी खरं बोलावं हा उपदेश.
* सत्य म्हणजे सोबत पुरावा जोडावा लागतो.
 
घसरडं - निसरडं
* पडून झालं की घसरडं.
* सावरता येतं ते निसरडं.
 
अंधार - काळोख
* विद्युत पुरवठा खंडीत झाला की होतो तो अंधार.
* निसर्गात जाणवतो तो काळोख.
 
पडणं - धडपडणं
* पडणं हे अनिवार्य.
* धडपडणं हे कदाचित सावरणं.
 
पाहणं - बघणं
* आपण स्वत:हून पाहतो.
* दुस-यानं सांगितल्यावर होतं ते बघणं.
 
पळणं - धावणं
* पाकीटमार काम झाल्यावर जे करतो ते पळणं.
* ट्रेन पकडतांना आपण जे करतो ते धावणं.
 
झाडं - वृक्ष
* जे माणसांकडून लावलं जातं ते झाडं.
* जो आधीपासूनच  असतो तो वृक्ष.
 
खेळणं - बागडणं
* जे नियमानं बांधलेलं असतं ते खेळणं.
* जे मुक्त असतं ते बागडणं.
 
ढग - मेघ
* जे वा-याने ढकलले जातात ते ढग.
* जे नक्की बरसतात ते मेघ.
 
रिकामा - मोकळा
 * वेळ जो दुस-याकडे असतो तो रिकामा. 
* आपल्याकडे असतो तो मोकळा वेळ.
 
निवांत - शांत
*कष्ट केल्यानंतर मिळतो तो निवांतपणा.
* काहीच न करता बसून मिळतो तो शांतपणा.
 
आवाज - नाद
* जो आपल्या चालण्यानं होतो तो आवाज.
* जो मोराच्या चालण्यानं होतो तो नाद.
 
झोका - हिंदोळा
* जो आपला नंबर बागेत कधी लागेल याची वाट पाहायला लावतो तो झोका. 
* जो मुक्तपणे झाडांमधून खेळता येतो तो हिंदोळा.
 
स्मितं - हसणं
* मनात एखादी गोड आठवण आली की जे दिसतं ते स्मित.
* जे लोकां समोर दाखवावं लागतं ते हसणं.
 
अतिथी - पाहुणा
* जो यावा यावा असा वाटतो तो अतिथी.
* जो आला की कधी जाईल असं मनात येतं तो पाहुणा.
 
घोटाळा - भानगड
* जो अचानक नकळत होतो तो घोटाळा.
* जी नियोजनबद्ध पद्धतीने होते ती भानगड.
पुढील लेख
Love Shayari नजरेतील मादकता घायाळ करते हृदयाला