शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. गुरूमंत्र
Written By वेबदुनिया|

करियर बदलताय, अगोदर विचार करा

एखाद्या क्षेजत्रात करियरमध्ये शिखर गाठल्यानंतर महत्वाकांक्षी युवक करियर शिफ्ट करण्याच्या विचारात असतात. एकसारखेच काम करण्यापेक्षा काहीतरी मनासारखे किंवा वेगळे करण्याची त्यांची इच्छा असते. मात्र या टप्प्यावर आपणांवर काही आर्थिक जबाबदार्‍याही असल्याने या वळणावर करियरमध्ये बदल धोकादायक ठरू शकते.

करियरच्या या वळणावर आपण बदल करत असल्यास काही गोष्टींवर लक्ष ठेवा. एका क्षेत्रातून दुसर्‍या करियर क्षेत्रात शिरताना पूर्णपणे खात्री करून घ्या. नाहीतर फक्त बदलासाठी बदल केला आणि स्वत:चे नुकसान करून घेतले, असे होता कामा नये.

पैसाच सर्वकाही नाह
सद्याच्या करियर क्षेत्रात कमी पैसे असून बदल केल्यानंतर जास्त पैसे मिळेल, अशा विचाराने करियर बदल करत असल्यास हा चूकीचा विचार आहे. पुढे जाण्यासाठी प्रत्येकच क्षेत्रात एक विशिष्ट पद्धती असते. हे लक्षात घेता फक्त पैसा बघूनच करियर बदल करू नका.

इतरांनी बदल केला म्हणून आपणही...
एखादा व्यक्ति पाच-सात वर्षापासून एकाच कंपनीत काम करत आहे, तर त्याच्या दुसर्‍या सहकार्‍याने मिडियात रूची असल्याचे त्या क्षेत्रात प्रवेश केला, असे चित्र आपणांस बघायला मिळेल. सहकार्‍याने करियर बदल केला म्हणून तुम्हीही करावा, हे आवश्यक नाही. आपणांस आपल्या प्राथमिकता़ सुविधा आणि आवड-निवड लक्षात घ्यावी लागेल.

स्वत:ची क्षमता ओळख
बहुतेकदा युवावर्ग घाईगडबडीत करियर बदलण्याचा विचार करतात आणि त्याची अंमलबजावणीही करून टाकतात. मात्र दुसर्‍या क्षेत्रात काम करायला सुरूवात केल्यानंतर त्यांना असहज वाटायला लागते. आपली क्षमता, कौशल्याची स्वत:स ओळख नसल्याने असे होते. म्हणून करियर बदलाअगोदर तुमच्यात ते दुसरे काम करण्याची क्षमता किंवा कौशल्य आहे काय, हा विचार पहिल्यांदा करा. यासंबंधी आपण द्विधा मनस्थितीत असल्यास पहिल्यांदा स्वत:चे आकलन करा.

नवीन पदवी घ्यायची किंवा नाह
काही युवा मित्र एखाद्या क्षेत्रात काही वर्ष घालवल्यानंतर आवडीच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी नवीन पदवी घेण्यासाठीही तयार असतात. मात्र ही पदवी आपणांसाठी फायद्याची किंवा नुकसानकारकही ठरू शकते. कारण पदवी प्राप्त करण्यासाठी आपणास अभ्यास वगैर गोष्टींवर विशेष लक्ष द्यावे लागेल आणि सद्या आपण करत असलेल्या कामाकडे दुर्लक्ष होईल. अशा परिस्थितीत 'घर का ना घाट का' अशी स्थिती उद्भवू शकते. करियर बदलण्यासंबंधीचा महत्त्वपूर्ण निर्णय स्वत:च घेऊ नका. याबाबतीत कुटुंबातील सदस्य आणि मित्रांचा सल्ला घ्या. आपल्या समस्येवर ते चांगला पर्याय सुचवू शकतील.