1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

चालून टाळा हृदयविकार

अलीकडच्या काळात हृदयाशी संबंधित विकार असणार्‍या स्त्री-पुरुषांचं प्रमाण वाढलं आहे. बदललेली जीवनशैली, वाढते ताणतणाव, खाण्या-पिण्याबाबत न बाळगली जाणारी सतर्कता अशी हृदयाशी संबंधित आजार वाढण्यामागील अनेक कारणं आहेत. पण, अशा रुग्णांसाठी एक खुशखबर आहे. अलीकडेच एक संशोधन झालं असून त्यामध्ये म्हटलं आहे की, रोज 20 किलोमीटर चालल्याने हृदयविकार होण्याचा धोका आठ टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

हे संशोधन लॅन्सेट मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. रोज किमान 20 किलोमीटर म्हणजे दोन हजार पावलं चालणं हे हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं या संशोधनात नमूद करण्यात आलं आहे. यामुळे हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यास मदत मिळते असंही त्यामध्ये म्हटलं आहे.

लेसेस्टर विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत संशोधन केलं आहे. संशोधकांनी आपल्या निष्कर्षात म्हटलं आहे की, 20 मिनिटं चालणं हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं त्याप्रमाणे

40 मिनिट चालणं हे हृदयरुग्णांसाठी स्टॅटीनच्या गोळीप्रमाणे फायदेशीर ठरतं. हृदयाच्या विकाराने त्रस्त असणार्‍यांना विविध प्रकारच्या औषधांचा सामना करावा लागतो. पण, रोज चालण्याचा व्यायाम केला तर अशा आजारांपासून दूर राहता येईल.

संशोधकांनी म्हटलं आहे की, हृदयरोगाने त्रस्त असणार्‍यांना दिल्या जाणार्‍या औषधांचे साईड इफेक्ट असू शकतात. पण, चालण्याच्या व्यायामाने हे टाळता येईल. रोज 40 मिनिटं नियमित चालल्यामुळे हृदयविकार होण्याचा धोका 16 ते 20 टक्क्यांनी कमी करता येतो, असं संशोधनात आढळून आलं आहे. या संशोधनासाठी 40 देशातील 9,306 लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्यांना 12 महिन्यांपर्यंत दररोज 20 ते 40 मिनिटं चालण्यास सांगण्यात आलं.

तसं केल्यानंतर त्यांच्या शरीराची तपासणी करण्यात आली. त्याआधीही त्यांची तपासणी करण्यात आली होती. हृदयाशी संबंधित आजाराने त्रस्त असणार्‍या लोकांच्या आरोग्यावर नियमितपणे चालण्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचं या संशोधनात आढळून आलं. तेव्हा सकाळ- संध्याकाळी चालायचा व्यायाम चुकवू नका.