1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 11 जून 2016 (11:41 IST)

पाण्याच्या बाटलीचा पुनर्वापर करणे, हा मोठा धोका?

मिनरल वॉटर घेतल्यानंतर तुम्ही त्या बाटलीचा पुनर्वापर करत असाल तर ते चुकीचे आहे. कारण प्लॅस्टिक बाटलीतील पिण्याचे पाणी जर शेअर केले तर त्याने बॅक्टेरीआ पसरू शकतात, ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. 
 
प्लॅस्टिक पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचा पुनर्वापर केला तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे. कारण प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये हानिकारक रसायने असतात जे तुमच्या पिण्याच्या पाण्यात मिसळतात. मात्र, असं काही नाही की तुम्ही पाण्याचा पुनर्वापर करू शकत नाहीत. फक्त स्वच्छता पाळणे गरजेचे आहे. 
 
आजकाल प्लॅस्टिक बॉटल या सगळ्यात सोयीस्कर मानल्या जातात. पण त्याचा पुनर्वापर हा योग्य नाही. जर तुम्ही त्याचा पुनर्वापर करणार असाल तर निदान त्या नीट धुवून घ्या. शक्यतो बाटल्या गरम पाण्याने धुवा. कोणत्याही प्लॅस्टिकमध्ये बॅक्टेरीआचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अशा प्लॅस्टिकमधून पाणी पिणे हे जास्त हानिकारक असते. अशा बाटल्यांचा धोका वाढल्याने, अनेक देशांनी प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी आणली आहे.