शनिवार, 12 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: बुधवार, 13 सप्टेंबर 2023 (14:48 IST)

Acidity Or Heart Attack ॲसिडिटी की हार्ट अटॅक

डॉ. कौशल छत्रपती, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट
 
Acidity Or Heart Attack
Acidity Or Heart Attack अॅसिडिटी (Acidity) होणं म्हणजे पित्त हा आजार तसा सामान्य आहे. दैनंदिन जीवनात चुकीचा आहार घेतल्यानं, अनियमित व्यायाम किंवा अपुरी झोप आदी कारणांमुळे पित्त किंवा अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो.भूक नसताना जेवणे, मसालेदार अन्नपदार्थांचे सेवन, चहा किंवा कॉफीचे अतिसेवन आणि रात्री उशीरा जेवणे तसेच जेवल्यानंतर लगेच झोपणे अशा वाईट सवयी ॲसिडिटीस कारणीभूत ठरतात. काही औषधांमुळे छातीत जळजळ होते जसे की ॲंटीबायोटिक्स, आयन इत्यादी.
 
अॅसिडिटी आणि ऱ्हदय विकाराची लक्षणे जवळपास सारखीच असतात. ही लक्षणे न टाळण्याजोगी असतात. त्यामुळे यातील फरक ओळखणे फार कठीण होते. अॅसिडीटीमध्ये छातीत जळजळ जाणवते. विशेषत, पोटाच्या वरच्या भागात ही जळजळ जास्त प्रमाणात होते. अॅसिडिटीमुळे तोंडात आंबट आणि कडू चव येते काही वेळेस उलट्याही होतात. हृदयविकाराच्या झटक्यात छातीत दुखते या वेदना छातीपासून मान,जबडा आणि पाठीपर्यंत पसरते. पोटात दुखणे, धाप लागणे, घाम येणे आणि चक्कर येणे अशी लक्षणे आहेत. हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्याने हा त्रास होतो. 
 
या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका
. अस्वस्थतता वाटून भरपूर घाम येणे
. रक्तदाब कमी होणे अथवा खुप वाढणे
. जीव घाबरणे
. हात, जबडा इत्यादींमध्ये होणारी वेदना.
. अँटासिड्समुळे होणाऱ्या वेदना.
. असह्य वेदना होणे
. जोखीम घटक: जसे धूम्रपान, वाढते वय, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल
 
जेव्हा जेव्हा रुग्णाला वरील लक्षणे दिसतात तेव्हा ईसीजी आणि कार्डियाक तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. जर पहिला ईसीजी सामान्य असेल तर १० मिनिटांनंतर पुन्हा ईसीजी करावा. जेव्हा 12 तासांचा ईसीजी सामान्य असतो आणि एंजाइम वाढलेले नाहीत तेव्हाच हृदयविकाराचा झटका नाही असे स्पष्ट होते.
 
असिडिटी आणि हृदयविकाराचा झटका यांच्या लक्षणांमध्ये साम्यता असली तरी वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे, औषधोपचार करणे तसेच लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये.