1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (18:13 IST)

कोरोनाने वाढतोय अशक्तपणा

कोरोना संसर्गामुळे शारीरिक हालचाली, गती आणि कंडिशनिंगमध्ये बदल होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे वय कमी होणे आणि स्नायूला कमी बळकटी मिळण्याची शक्यता बळवल्याचे अमेरिकेच्या एका नवीन राष्ट्रीय सर्वेक्षणातून आढळून आले आहे.
 
मिशिनग युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थकेअर पॉलिसी अँड इनोव्हेशनच्या संशोधकांनी हेल्थ एजिंगवर नॅशनल पोलचे आयोजन केले होते. या पोलमध्ये 50 ते 80 वयोगटातील किमान 2 हजारांपेक्षा अधिक पुरुषांचे मत आणि नमुने घेतले यावर काही निष्कर्ष काढण्यात आले. हे सर्वेक्षण कोरोनाच्या सुरूवातीच्या काळातील आहे. सर्वेक्षणाचा कालावधी हा मार्च 2020 आणि जानेवारी 2021 पर्यंतचा आहे. सर्वेक्षणात म्हटले की, सर्वेक्षणात सहभागी एकूण ज्येष्ठांपैकी 25 ट्रके ज्येष्ठांना अशक्तपणा येऊन त्यांना चर येण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आले. यापैकी 40 टक्के लोकांमध्ये कालांतराने घसरण झाली. कोरोनाची लाट आल्यानंतर एक तृतीयांशपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांनी शारीरिक रुपाने काम करण्याचे थांब मार्च 2020 नंतर वर्कआउट आणि बाहेर फिरण्यावर निर्बंध आले. त्यामुळे हालचाल कमी होण्याचे प्रमाण 27 टक्के राहिले. त्यांची शारीरिक स्थिती, लवचिकता, स्नायू यांची शक्ती आणि सहनशक्ती कमी झाली. हालचाल कमी झाल्यामुळे चक्कर येण्याचे प्रमाण 23 टक्क्यांपर्यंत वाढले.
 
ओपनिंग पोलचे संचालक आणि मिशिनग मेडिसिन साथरोग डॉक्टर प्रीति मलानी यांनी म्हटले की, सर्वेक्षणातून एक बाब कळते की, कोरोना काळात ज्येष्ठ नागरिकांत एकटेपणा आणि सहजीवनाचा अभाव आदी कारणांमुळे हालचाली मंदावणे, पडणे यासारख्या गोष्टींची जोखीम वाढू शकते. आत्मविश्वास हा ज्येष्ठ नागरिकांत वयापरत्वे कमी होतो. परंतु कोरोनाने यात भर घातली आणि ती गोष्ट पदोपदी दिसून आली. मलानी यांनी म्हटले की, जेव्हा जीवनमान सुरळीत होईल आणि विशेषतः ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत अशा वयस्कर मंडळींशी आरोग्य कर्मचारी, आप्तेष्ट, मित्रांनी अधिकाधिक संवाद साधण्यावर भर देणे गरजेचे आहे. त्यानुसार ते सुरक्षितपणे शारीरिक हालचाली आणि कार्य करू शकतील.
 
अमेरिका साथरोग नियंत्रक आणि प्रतिबंध केंद्राच्या मते, दरवर्षी 32 हजारांपेक्षा अधिक ज्येष्ठांचा मृत्यू होतो. अलीकडच्या काळात या संख्येत वाढ झाली आहे आणि त्याचवेळी अमेरिकेत लोकसंख्यावाढण्याबरोबरच वयोमानही वाढण्याची आशा आहे.
 प्रा. विजया पंडित