गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

हृदय विकाराच्या झटक्याशी संबंधित लक्षणे आणि उपाय जाणून घ्या

हृदय विकाराचा झटका तेव्हा येतो जेव्हा हृदयात ऑक्सिजन असलेल्या रक्ताचा प्रवाह अचानक कमी होतो.या पूर्वी ह्या म्हातारपणाचा आजार मानला जात होता पण सध्याच्या खराब जीवनशैली, कामाच्या वाढत्या ताणामुळे आणि  खाण्यापिणाच्या चुकीच्या सवयीमुळे हृदयविकाराचा झटका कोणाला देखील येऊ शकतो.ह्याला हृदय विकाराचे मुख्य कारण मानले आहे. जे  जगभरात वेगाने पसरत आहे. वेळेवर ह्याच्या उपचार केला नाही तर मृत्यू  होण्याची  देखील शक्यता आहे.
 
असे मानले जाते की बायका हृदय विकारापासून सुरक्षित आहे. जेव्हा त्यांना जास्तीचा तणाव असतो, तेव्हाच त्यांना हृदय रोग होतो. तज्ज्ञ सांगतात की पुरुषांप्रमाणे स्त्रियांना देखील हृदय रोगाचा धोका तेवढाच आहे.म्हणून बायकांनी या लक्षणाला दुर्लक्षित करू नये. ह्या रोगाशी निगडित माहिती जाणून घेऊ या. 
 
* ह्या विकाराची विविध लक्षणे कोणती आहे?
ह्या विकाराची सर्वात सामान्य लक्षणे छातीत दुखणे आहे पण सर्वच रुग्णांना छातीत दुखण्यासह हृदय विकाराचा झटका येईल असे नाही.इतर काही लक्षणे आहे ज्यात एखाद्या व्यक्तीस हृदय विकाराचा झटका येऊ शकतो.
* पाठीत किंवा खांद्यामध्ये किंवा हातात वेदना.
* छातीत किंवा पोटात त्रास होणे.
* घाम येणं.
* शुद्ध हरपणे.
मधुमेहाच्या रुग्णांना एटीपिकल लक्षणासह हृदय विकाराचा झटका येऊ शकतो. हे हृदय विकाराच्या लक्षणांना दाखवत नाही म्हणून ह्याला 'सायलेंट हार्ट अटॅक देखील म्हणतात.
पुरुष आणि महिलांमध्ये हे लक्षणे एकसारखे असू शकतात. परंतु काही बायकांमध्ये हे लक्षणे एटीपीकल असू शकतात.
 
*लक्षणे दिसल्यावर काय करावं ?      
पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की घरात एखाद्याला हृदय विकाराचा झटका आल्यावर कृती करण्याची योजना असावी आणि योजने बाबत माहिती असावी. आपल्यापैकी कमीत कमी एकाला तरी  या विकाराच्या बाबतीत सीपीआर (कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन) सारख्या मूलभूत लाईफ सपोर्ट उपायांबद्दल माहिती असावी. या शिवाय कौटुंबिक डॉक्टर, ऍम्ब्युलन्स आणि नजीकच्या नर्सिंग होम किंवा रुग्णालयाचे महत्त्वाचे नंबर असावे. 
 
* उपचार -
आपल्याला वाटत आहे की हार्ट अटॅक येत आहे तर ताबडतोब खाली बसून घ्या किंवा झोपा. आणि शक्यतो जास्त हालचाल करू नये.कुटुंबाच्या सदस्यांना कॉल करा. कौटुंबिक डॉक्टर किंवा ऍम्ब्युलन्स पर्यंत पोहोचण्याची तयारी करा.जेणे करून जवळच्या वैद्यकीय केंद्रात घेऊन जाता येईल. स्वतः  गाडी चालवत नेऊ नका.  
हृदय विकाराचा झटका आल्यावर वेळेचे महत्त्व आहे. छातीत दुखण्याच्या काही  तासातच हृदय विकाराचा झटका येऊ शकतो. एकतर अँजियोप्लास्टी किंवा औषधीसह ब्लॉक झालेली धमनी उघडणे फार महत्त्वाचे आहे.हे हृदयातील समस्या वाचविण्यासाठी आणि जीव वाचविण्यासाठी केले जाते. म्हणून कमी वेळेत योग्य वैधकीय सुविधा पर्यंत पोहोचण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजे.