शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

नैराश्य/ उदासीनता (डिप्रेशन) म्हणजे काय?

नैराश्य कोणालाही येउ शकते श्रीमंत- गरीब, स्त्री-पुरूष, लहान मुले ते वृद्ध. नैराश्य जीवनाच्या सर्व घटकांवर प्रभाव करते. छोट्या छोट्या दैनंदिन गोष्टीपासून ते करिअरवर परिणाम होतो. नैराश्य हा एक मानसिक आजार आहे ज्यामध्ये व्यक्तीस नेहमी उदास व निराश वाटते व दैनंदिन कामे तसेच आनंददायी गोष्टीतील इंटरेस्ट कमी होतो. सर्वसाधारणपणे दोन आठवडया पेक्षा जास्त दिवस त्रास झाल्यास त्यास आजार संबोधले जाते. त्याचा नात्यावर कुटुंबावरही तसेच दररोजच्या कामावर सुध्दा परिणाम होतो आणि सर्वात मोठा परिणाम म्हणजे आत्महत्या..
 
लक्षणे कुठली-
१. सतत उदास/ निराश वाटते किवा सतत चीडचीड होणे.
२. थकवा येणे, शक्ति नसल्यासारखे वाटते.
३. भूक कमी लागते, जेवणाची इच्छा न होणे किंवा वजन कमी होणे. काही लोकांमध्ये मात्र विरूध्द लक्षणे दिसू शकतात..
४. झोप न लागणे किंवा शांत व पुरेशी झोप न लागणे. काहीजणाना मात्र खूप झोप लागणे असाही त्रास होऊ शकतो.
५. कामावरती लक्ष न लागणे/ इच्छा कमी होणे, निर्णयक्षमता कमी होणे.
६. आपण काहीच कामाचे नाही, आपले काहीच चांगले होणार नाही, आपल्याला कोणीही मदत करू शकणार नाही असे वाटते
७. आत्महत्येचे विचार मनात येणे किंवा प्रयत्न करणे.
8. दुर्घटनेनंतर काही दिवस उदास, निराश वाटणं स्वाभाविक आहे. पण प्रत्येकवेळी असं घडायलाच हवं असं नव्हे. काहीवेळा विनाकारणही डिप्रेशन येऊ शकतं. याला मुख्यतः मेंदूत होणारे रासायनिक बदल - मुख्यत्वे (Serotonin व Norepihephrine)कारणीभूत असतात.
9. बाळंतपणानंतर होणारे संप्रेरकातील बदल बऱ्याच स्त्रियांमध्ये कारणीभूत ठरतात. पार्किन्सन्स, हायपोथायरॉइड यासारख्या काही शारिरीक आजारांमध्येही डिप्रेशनची लक्षणं दिसू शकतात. 
10. ब्लड प्रेशरची काही विशिष्ट औषधं, स्टेरॉइडस आणि काही पित्तशामक औषधांमुळेसुद्धा या आजाराची लक्षणे दिसू शकतात. लहानपणी घडलेल्या एखाद्या दुर्दैवी प्रसंगामुळेही मोठेपणी डिप्रेशन येऊ शकतं. 
नैराश्याचा धोका जास्त केव्हा असतो?
गरिबी, बेरोजगार आयुष्यातील मोठ्या घटना/ मानसिक आघात, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, घटस्पोट, ब्रेकअप, शारीरिक आजार तसेच दारू किंवा ड्रग्ज चे व्यसन असल्याच नैराश्य होण्याचा धोका अधिक असतो. परंतु असे काही कारण नसताना सुद्धा जैविक घटकामुळे.( मेंदूतील रासायनिक बदलामुळे (chemicalलोचा) नैराश्य येउ शकते.
 
काय कराल?
आपल्या जवळच्या व्यक्तीशी (नातेवाईक/मित्र) यांच्याशी बोला. गरज असल्यास मनोविकारतज्ञाची मदत घ्या. आराम करा. तणावाचे नियोजन करा. स्वतःसाठी वेळ द्या. छंद जोपासा.
 
आपल्यासमोर एखादी नैराश्य ग्रस्त व्यक्ती असल्यास त्याच्याशी बोला, त्याला बोलते करा व त्यास मनोविकारतज्ञाची मदत घेण्यास प्रवृत्त करा. 
2020 पर्यंत नैराश्य हा सर्वात मोठा आजार असेल व मृत्यूचे सर्वात मोठे वा प्रथम क्रमांकाचे कारण असेल. त्यामुळेच गरज आहे ती आत्ताच जागे होण्याची.
डिप्रेशन दूर करण्यास मदत करतात ह्या 4 आयुर्वेदिक औषधी
 
डिप्रेशनमुळे आमच्या शरीराला फारच नुकसान होत. यामुळे शरीरात पित्त, कफ आणि वातीचे असंतुलन होऊन जाते. त्याशिवाय अॅलर्जी, अस्थमा, हाय कोलेस्टरॉल आणि हायपरटेंशन सारख्या समस्या डिप्रेशनमुळे जन्म घेतात. काही आयुर्वेदिक औषधींचे सेवन केल्याने तुम्ही तणावापासून लगेचच मुक्ती मिळवून घेता. तर जाणून घेऊ अशा कोणत्या हर्बल औषधी आहे ज्या तणावाला दूर करण्यास मदत करतात.
 
ब्राह्मी
ब्राह्मी तणाव उत्पन्न करणार्‍या हार्मोन कोर्टिसोलला कमी करण्याचे काम करतो. ब्राह्मी मस्तिष्काला शांत करण्यासोबतच एकाग्रता वाढवण्यात फारच मदतगार सिद्ध होतो.
 
भृंगराज
भृंगराज चहा मस्तिष्काला निरंतर अॅनर्जी देण्याचे काम करते. यामुळे मस्तिष्कामध्ये रक्त संचारणं व्यवस्थित होतो. हे डोक्याला शांत ठेवतो तसेच पूर्ण शरीराला आराम देतो.
 
जटामासी
जटामासी एंटी स्ट्रेस हर्बच्या रूपात फारच लोकप्रिय आहे. तणाव दूर करण्यासाठी जटामासीच्या जडांचा वापर औषधीच्या स्वरूपात केला जातो. ह्या जडा आमच्या मस्तिष्क आणि शरीराला टॉक्सिन्सहून मुक्त करतात. व ब्रेन फंक्शन्सला दुरुस्त करण्यात मदतगार ठरतात.
 
अश्वगंधा
अश्वगंधा एमीनो ऍसिड्स आणि व्हिटॅमिनचा फारच उत्तम संयोजन आहे. अश्वगंधा डोक्यात एनर्जीला बूस्ट करणे व स्टॅमिना मजबूत करण्यात मदतगार ठरतो.