शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: न्यूयॉर्क , बुधवार, 10 जून 2015 (16:31 IST)

बियरचे सेवन केल्याने मस्तिष्काची कार्यक्षमता वाढते!

जास्तकरून लोकांना हे माहीत असते की रेड वाइन, ब्लूबेरी आणि डार्क चॉकलेट मनुष्याच्या स्मरणशक्तीसाठी फायदेशीर असते , पण हाच फायदा बियरमुळे ही मस्तिष्काला होतो. लहान उंदरांवर करण्यात आलेल्या प्रयोगांमध्ये वैज्ञानिकांना असे आढळले की बियरमध्ये उपस्थित असणारा जैंथोह्युमोल नावाचा तत्त्व त्यात संज्ञानात्मक कार्यांच्या क्षमतेला वाढवतो.  
 
पण प्रयोगात लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे बियरचा हा फायदा म्हातारे झालेल्या उंदरांना मिळाला नाही. शोधकर्त्यांच्या दलाने सांगितले की बियरमध्ये आढळणारे विशेष तत्त्व आणि रेड वाइन किंवा ब्लूबेरीमध्ये असणारे विशेष तत्त्वांचा अधिक अभ्यास करण्याची गरज आहे.  
 
वैज्ञानिकांनी म्हटले की उंदरांना प्रयोगात दिलेल्या बियरची मात्रा अधिक होती, पण आम्हीतर हा सल्ला देत नाही की मस्तिष्काची कार्यक्षमता वाढवण्यासाठी बियरचे सेवन सुरू करायला पाहिजे. हे अध्ययन जरनल बिहेविअरल ब्रेन रिसर्चमध्ये प्रकाशित झाले आहे.