1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला
Written By वेबदुनिया|

व्यायामामुळे जीवनाचे संतुलन चांगले

WD
सध्याच्या जगात कामाचा तणाव वाढला आहे. दिवसातील 10 ते 12 तास कर्मचारी कामावरच असतात. त्यामुळे त्यांचा जीवन जगणतील आनंद नाहीसा झाला आहे. वेळीअवेळी खाणे-पिणे, अवेळी झोप यामुळे शरीराचे संतुलन बिघडते. याचा परिणाम प्रकृतीवर होतो. हे टाळणसाठी जीवन व कामाचे योग्य संतुलन राखणसाठी व्यायाम उपोगी पडतो.

रोज व्यायाम केल्यास काम व दैनंदिन जीवनाचे योग्य प्रकारे संतुलन राखले जाते. तसेच दैनंदिन जीवनातील अडीअडचणींचा सामना अधिक प्रभावीपणे करता येतो, असे लिओ विद्यापीठाच व्यवस्थापन शाखेचे सहायक प्राध्यापक रसेल क्लेटन यांनी सांगितले.

या प्रयोगासाठी 476 कर्मचार्‍यांचा अभ्यास केला. त्यांना एक प्रश्नावली भरून देण्यास सांगितली. त्यांना उत्तराचे चार पर्याय दिले. त्यातून त्यांच्या व्यायामाच्या सवयींची माहिती मिळाली. दैनंदिन जीवन आणि काम यांच्यामध्ये संघर्ष होत असतो. दैनंदिन कामाचा अडथळा कायमच कौटुंबिक जीवनात होत असतो, असे संशोधकांनी सांगितले.

ज्यावेळी कौटुंबिक जीवन तणावग्रस्त असते त्याचा परिणाम कामावर होत असतो. त्यामुळे वेळेत काम करणे अशक्य होते. मात्र ज्या व्यक्ती व्यायाम करतात त्यांना जीवनाचा व कार्यालयातील कामाचे योग्य संतुलन राखता येते. यापूर्वी केलेल्या अभ्यासात व्यायामामुळे केवळ ताण कमी होत असल्याचे आढळले होते. चीनमधील ताई-चाई या मार्शल आर्टचा व्यायाम 12 आठवडे केल्यास तणाव कमी होत असल्याचे आढळले होते. तसेच अँरोबिक व्यायामही माणसाला फायदेशीर ठरतो, असे संशोधनात आढळले.