शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 26 ऑगस्ट 2020 (12:47 IST)

वार-वार ढेकर येत असल्यास ह्याला सहज समजू नये, 5 कारणे जाणून घ्या

बऱ्याचशा लोकांना संपूर्ण दिवसभरात अनेकदा ढेकर येण्याची तक्रार असते, ज्या मुळे त्यांना इतर लोकांसमोर लाजिरवाणं होतं. आपल्यालाही अशी कुठली तक्रार असल्यास ह्याला सहज घेऊ नका. चला, जाणून घेऊ या की कशामुळे वारंवार ढेकर येतात.
 
1 कधी-कधी खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी मुळे देखील ढेकर येऊ शकतात. तळकट, भाजके पदार्थ, कोल्डड्रींक्स, फुलकोबी, बीन्स, ब्रोकोली इत्यादी खाल्ल्याने पोटात गॅस बनते, जे ढेकर येण्याचे कारणीभूत असतात. हे पदार्थ रात्री खाणे टाळावे.
 
2 बद्धकोष्ठतेचा त्रास देखील ढेकर येण्याचे मुख्य कारण असू शकत. यासाठी आपल्याला प्रथम बद्धकोष्ठतेचा त्रासाला दूर केले पाहिजे.
 
3 अपचन हे वारंवार ढेकर येण्याचे कारण आहे अपचन. जर आपण घेतलेले अन्न पचत नसेल तर ही समस्या साधारण आहे.
 
४ बऱ्याच वेळा छोटे-छोटेशे कारणं पोटात गॅस करतात आणि अश्या समस्या उद्भवतात, जसे ग्लासाने पाणी पिण्याऐवजी वरून पिणं, जेवताना बोलणे, च्युईंगम इत्यादींमुळे पोटात जाऊन गॅस करतात आणि हा त्रास उद्भवतो. याला एरोफेस असे म्हणतात.
 
5 जेव्हा गॅसमुळे आपली पचक प्रणाली विस्कळीत होते, तेव्हा एच पायलोरी नावाच्या जिवाणूंमुळे पेप्टिक अल्सर किंवा गॅस्टिक अल्सराचा त्रास उद्भवतो जे ढेकर येण्यासह पोट दुखीचे कारणं असू शकतात.