पावसाळ्यात कोणत्या चुका टाळू शकतो याबद्दल जाणून घेऊया

rainy season food not eat
Last Modified बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (23:34 IST)
नुकतीच पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळा आणि पाऊस थांबल्यानंतर होणारा उकाडा या गोष्टी एकामागोमाग असतातच. त्यामुळं सर्दी – ताप आणि इतर आजारांना साहजिकच आपण निमंत्रण देतो. निरोगी राहण्यासाठी पावसाळ्यात आपण नक्की काय करू शकतो, कोणत्या चुका टाळू शकतो याबद्दल जाणून घेऊया.
१. छत्री वा रेनकोट घ्यायला विसरु नका – पावसाळ्यामध्ये वातावरण असो वा नसो कायम छत्री अथवा रेनकोट घेऊन जावे. कधीही या गोष्टी नेण्यास विसरू नका. पावसामुळे सर्दी ताप हे आजार होणं साहजिक आहे. त्यामुळं पावसात भिजून दिवसभर तसंच स्वतःला ओलं ठेऊ नका.
२. रस्यावरील आणि तळलेले पदार्थ खाणं टाळा – पावसाळ्यात सर्वात जास्त आजार होतात. त्यामुळं रस्त्यावरील खाणं आणि तळलेलं बाहेरचे पदार्थ खाणं जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करा. या खाण्यामुळं पोटात गॅस तयार होऊन पोटदुखी होण्याचा संभव असतो. तसंच खराब पाण्याचा वापरदेखील या पदार्थामध्ये केला जाऊ शकतो. त्यामुळं आपण स्वतः याची खबरदारी घेणं योग्य.
३. पाणी पिण्याचं प्रमाण कमी करू नका – पावसाळ्यात तहान जास्त लागत नसल्यामुळं साहजिकच पाणी पिण्याचं प्रमाण कमी होतं. मात्र असं करू नका. त्यामुळं डिहायड्रेशन होण्याची शक्यता वाढते. इतकंच नाही त्यामुळं प्रतिकारशक्ती कमी होऊन तुम्हीच आजारांना निमंत्रण देता. पावसाळ्यामध्येदेखील चार ते पाच लीटर पाणी प्या.
४. स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका – जेवणापूर्वी वा जेवणानंतर स्वच्छ हात धुणं गरजेचं आहे. त्यामुळं हात न धुता कधीही जेऊ नका. बाहेरून आल्यानंतर पावसाळ्यातील चिखलामुळं बरेच बॅक्टेरिया अंगावर असतात. त्यामुळं स्वच्छ पाय धुवून मगच घरात यावं. केवळ पाण्यानं पाय न धुता साबणानं स्वच्छ पाय धुवावे.
५. कपडे धुण्याकडे दुर्लक्ष करू नका – पावसाळ्यामध्ये कपडे लवकर सुकत नाहीत आणि भिजल्यामुळे प्रत्येक वेळी तुमच्या लॉन्ड्री बास्केटमध्ये कपड्यांची भर पडत रहाते. वातावरणातील ओलसरपणामुळं कपड्यांमध्ये बॅक्टरिया सहज पोसले जातात. यामुळं लंग इनफेक्शन होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये कपडे साचून न ठेवता वेळीच धुवा.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

जागतीक गुलाब दिवस...

जागतीक गुलाब दिवस...
गुलाब, नुसतं म्हटलं की येतो अंगावर काटा मखमली, कधी कधी तर खुलते, ओठावर गुलाबी कळी,

Biography :कादंबरीकार मराठी लेखक विष्णू सखाराम खांडेकर

Biography :कादंबरीकार मराठी लेखक विष्णू सखाराम खांडेकर
विष्णू सखाराम खांडेकर यांचा जन्म 19 जानेवरी 1898 रोजी महाराष्ट्रातील सांगलीत झाला. ...

डोहाळे का लागतात? कारण ऐकून व्हाल थक्क!

डोहाळे का लागतात? कारण ऐकून व्हाल थक्क!
एखाद्याला एखादा विशिष्ट पदार्थ खायची तीव्र इच्छा झाली की आपण सहज म्हणून जातो - डोहाळे ...

Side Effects of Pineapple: अनानस खाल्यास घातक ठरू शकते अशा ...

Side Effects of Pineapple:  अनानस खाल्यास घातक ठरू शकते अशा प्रकारची अॅलर्जी
Pineapple किंवा अननस खाण्याचे अनेक फायदेआहेत. त्यात कॅलरीज कमी असतात आणि जीवनसत्त्वे आणि ...

Shoe Bites नवीन चपला- जोडे चावतात ? तर खास आपल्यासाठी हे ...

Shoe Bites नवीन चपला- जोडे चावतात ? तर खास आपल्यासाठी हे टिप्स
नव्या चपला किंवा शूज घालण्याची मजा तेव्हा मूड खराब करुन जाते जेव्हा पायाला जखम होते किंवा ...