मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 13 सप्टेंबर 2020 (08:30 IST)

आयुर्वेदानुसार खाण्यापिण्याचा या सवयींमुळे शरीर आणि मन निरोगी राहतं

मनाची घालमेल किंवा मन अशांत असल्याचा परिणाम आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी वर देखील पडतो. सध्याच्या काळात हे जग ज्या अनियमितेच्या वाटचाली वर चालले आहेत, त्या कारणामुळे लोकांना निव्वळ मानसिक अस्वस्थताच जाणवत नाही तर त्यांना खाण्यापिण्याकडे लक्ष देखील देता येत नाही ज्यामुळे त्यांना बऱ्याच समस्यांना सामोरी जावं लागत आहे. अश्या परिस्थितीत आपण बोलू या, खाण्यापिण्याबद्दल. तर आयुर्वेदात अश्या बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्यांचा वापर करून आपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी व्हाल. आपण या गोष्टींना आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनवू शकता.
 
* वाफवून किंवा अर्धवट उकळलेल्या भाज्या खाव्या - 
जर आपण भाज्यांना पूर्णपणे शिजवून खात असल्यास, लक्षात असू द्या की त्यांना जास्त शिजवू नका. असे केल्यास त्यांचा मधील पोषक द्रव्य कमी होतात. परंतु आपल्या त्यांना अर्धवट शिजवले तर ते आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. अन्न शिजवताना लक्षात असू द्या की आपल्याला भाज्या जास्त प्रमाणात शिजवायचा नाही आणि त्यांना कच्च्या देखील ठेवायचं नाही. 
 
* कच्चे मसाले भाजून आणि दळूनच वापरावे - 
प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी कच्चे मसाले तव्यावर भाजून आणि दळून वापरावे. विशेषतः हिवाळा किंवा पावसाळ्यात आलं तव्यावर भाजून खाऊ शकता.
 
* गव्हाचे चाळलेले पीठ वापरू नये - 
गव्हात फायबर असतं. पण त्यातील तपकिरी भागात जास्त प्रमाणात फायबर असतं. आपण गव्हाचे पीठ वापरताना लक्षात ठेवावं की ते न चाळताच वापरावं. कोंडा असलेले पीठ आरोग्यास चांगले मानले जाते.
 
* थंडगार अन्न खाल्ल्याने पचन क्रिया कमकुवत होते - 
थंडगार अन्न खाणं टाळा. हे आपल्या पचन वर परिणाम करू शकतं. त्याच बरोबर हे लक्षात ठेवावं की पोट भरूनं कधीही जेवू नये. आयुर्वेदानुसार पुरेसे अन्न न खाल्ल्याने अन्न सहजच पचतं.
 
* गोड कमी खावं - 
आयुर्वेदानुसार गोड कमी खावं. गोड खाण्याचे पर्याय म्हणून आपण मध किंवा गूळ वापरू शकता. हे आपणांस मधुमेह सारख्या आजारापासून वाचवू शकतो.