शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 4 जुलै 2019 (11:46 IST)

हँगओव्हरची तक्रार असल्यास हे सोपे उपाय करून बघा

ड्रिंक केल्यानंतर अनेकदा लोकांना हँगओव्हरची तक्रार असते, अशात लोकांना मळमळणे, भूक न लागणे अश्या समस्या उद्भवतात. अधिक मात्रामध्ये दारू पिण्याने काही तासानंतर हँगओव्हर होतं. हँगओव्हर उतरविण्यासाठी काही सोपे उपाय:
ब्रेकफास्ट
हँगओव्हर झाले असेल तरी ब्रेकफास्ट मिस करणे योग्य नाही. वेळेवर नाश्ता करा. याने ब्लड शुगर लेवल वाढतं आणि हँगओव्हरपासून राहत मिळते. ब्रेकफास्टमध्ये ब्रेड किंवा ऑम्लेट खाऊ शकता. ऍपल ज्यूस पिणे योग्य ठरेल.
भरपूर पाणी प्या
पर्याप्त मात्रेत पाणी प्या. याने डिहाइड्रेशनची तक्रार दूर होईल आणि ब्रेन सुरळीत काम करेल. हँगओव्हर झाल्यावर पाण्याच्या कमीमुळे मेंदूचे टिशू आक्रसून जातात ज्यामुळे डोकेदुखीला सामोरा जावं लागतं.
 

 


चहा : आल्याचा चहा यासाठी सर्वोत्तम आहे. याने पोट स्वच्छ होऊन जातं.
  अंडी : दारू पिण्याने लिव्हरला नुकसान होतं. अशात अंडी खा. अंडीमध्ये आढळणारे तत्त्व दुष्परिणाम कमी करण्यात मदत करतं.
मल्टीव्हिटॅमिन
जर आपण रेग्युलर ड्रिंक करत असाल तर आपल्याला दररोज मल्टीव्हिटॅमिन औषधाचे सेवन करायला हवे. हे शरीरातील पोषक तत्त्वांची कमी दूर करतं.
 

  
योगासन : श्वसनासंबंधी व्यायाम किंवा योग करा. मेडिटेशन करणे योग्य राहील. याने ऑक्सिजनचा संचार सुरळीत राहील. व्यायाम जमत नसल्यास वॉक तरी करायला हवा.