शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

उन्हाळा आला तब्बेत सांभाळा!

ऋतुमानानुसार आपल्या दिनक्रमात व आहारात बदल होत असते. हिवाळ्यात थंडी पासून बचावासाठी गरम कपडे, पावसाळ्यात भिजण्यापासून वाचण्यासाठी रेनकोट, छत्री तर उन्हाळ्यात कडक उन्हापासून स्वंरक्षण करण्यासाठी टोपी, रूमाल, दुपट्टा, गॉगल. उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी अननस, मोसंबी, टरबुजाचा रस, आइसक्रिम, कैरीचे पन्हे, कोकम शरबत यासारखी शरीरास थंडावा देणारी द्रव्य आपण घेत असतो.  अति उन्हामूळे शरीरात शुष्कता येत असल्याने खरबुज, टरबुज यासारख्या थंडावा देणारया फळांचे सेवन करणे हितकारक ठरते. शरीरातील पाणी व ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी याचा उपयोग होतो. उकाडा चाळीस-बेचाळीस अंशावर पोहचला की दैनदिन जीवनक्रमावर त्याचा परिणाम जाणवायला सुरूवात होते. 
उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी बहुतांश काम सकाळी व संध्याकाळी आटोपून घेतलेली बरी. सर्वानाच हे शक्य नसते. उन्हात बाहेर पडायचे अगोदर आपापली आवड व सोयीनुसार टोपी, पांढरा दुपट्टा, रूमाल व उन्हाचा गॉगल घेवून उन्हापासून बचाव निश्चित करावा. उन्हात बाहेर निघण्या अगोदर एसी, कुलरची थंड हवा घेणे टाळावे. 
उन्हात दिवसभर किवा जास्त वेळ फिरायचे झाल्यास प्रत्येक अर्ध्या तासानंतर सावलीत थांबुन थंड पाणी प्यावे. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित होण्यास मदत होवून उन लागत नाही. उन्हात भरपूर फिरल्यानंतर थंड पेये पिवून लगेच परत उन्हात जाणे टाळावे. दररोज उन्हात फिरणे आवश्यक असणारयांनी याची विशेष दक्षता घ्यावी. 
 
उन्हाळ्यात लिंबु शरबत, कैरीचे पन्हे, कोकम शरबत, अननस व मोसंबीचा रस, आइसक्रिम यासारखी शुष्कता घालवून शरीरास ताजेपणा देणारे पदार्थ घरात ठेवणे आवश्यक आहे. बाजारातील पेयांपेक्षा घरगुती पदार्थाचे सेवन हितकारक. उन्हाळ्यात आजारी पडू नये यासाठी बाहेरचे खाद्यपदार्थ, पेय घेणे टाळावे. 
उन्हाच्या तीव्र झोतामुळे डोळ्यांची जळजळ होवून नये यासाठी उन्हाचा गॉगल वापरणे हितावह. उन्हाळ्यात बर्फ गोळा, कुल्फी, आइसकांडी, खाण्याचा मोह बहुतेकांना आवरत नाही आणि येथेच फसगत होते. बर्फ बनविण्याची प्रक्रिया, व सार्वजनिक ठिकाणची पेये, बनवितांना वापरण्यात येणारे पाणी, व एकंदरीत स्वच्छता याचा तालमेळ नसतो. 
 
यातून उन्हाळ्यात पसरणारया रोगांच्या विषाणूंचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. उन्हातन फिरल्यावर उलट्या, जीव मळमळ करणे, चक्कर येणे यासारखे लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांना भेटून उपचार करून घ्यावेत. उन्हाळ्यात उन लागून आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. यासाठी उपाशी पोटी घराबाहेर निघू नये. 
घराबाहेर पडतांना जेवन शक्य नसले तरि न्याहारी करूनच बाहेर पडावे. जेवणांत कांद्याचा वापर करावा. ग्रामीण भागात उन लागु नये यासाठी लोक पगडी, टोपी किवा शर्टच्या खिशात कांदा ठेवतात. उन लागल्यास घरगुती उपाय म्हणजे कांद्याचा रस काढूण हाता-पायाचे तळव्यांवर लावतात. उन्हाळ्यातील पेहरावही ऋतुमानानुसार बदलत असतो. 
 

हिवाळ्यातील गरम कपडे पेटीबंद होवून सुंदर दिसण्या सोबतच उन परावर्तीत करणारे व हवा खेळती ठेवून शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणारे कपडे घालावे. उन्हाळा म्हणजे घामाचा वैताग. उन्हाळ्यात थंड राहणारे कॉटनचे कपडे घालावे. पेहराव शेरवाणी, कुर्ता-पायजामा, शर्ट-पँट ऑकेजन नुसार कोणताही, फक्त तो शरीरास सहायक असायला पाहिजे. 
उन्हाळा म्हणजे लग्न प्रसंगांची धामधूम. आनंददायी सांस्कृतिक सोहळा. या सोहळ्यांचा आनंद तब्येत सांभाळूनच घ्यावा. अगोदरच उन व त्यात सोहळ्यातील पंगतीत पाहुण्यांचा आग्रह यात तब्येत सांभाळने म्हणजे दिव्य कामच!