ह्या घरगुती उपायांनी ताप पळवा
ताप आल्यावर प्रत्येक वेळी डॉक्टरांकडील औषधांबरोबरच घरगुती उपाय देखील करावेत.
काय आहेत हे घरगुती उपाय…
– तुळशीच्या पानांचा काढा तयार करून त्यात वेलची पूड आणि साखर घालून प्यायल्याने ताप लवकर उतरतो.
– आल्याचा चहा घेतल्यानेही आराम मिळतो. याने तापासोबत कफही निघून जाईल.
– तापात बेलफळाचं चूर्ण उपयुक्त ठरतं. बेलफळाचं चूर्ण पाण्यात घालून ताप उतरेपर्यंत घ्यावं.
– सफरचंद, दूध, खिचडी, टोमॅटो सूप, आलं, लसूण, काळी मिरी, शेवगा, कारली या पदार्थांचा समावेश करावा.
– कपभर उकळत्या पाण्यामध्ये मूठभर ताजी तुळशीची पानं टाका. हे मिश्रण ५-१० मिनिटे उकळू द्या. ते गाळून दिवसातून दोनदा प्या. मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांसाठी हा काढा फायदेशीर ठरतो. यामुळे ताप कमी होतो.
– तापकमी करण्यासाठी तुळशीचा रसदेखील फायदेशीर ठरतो. लहान मुलांसाठीदेखील हा उपाय सुरक्षित आणि फायदेशीर आहे. १०-१५ तुळशीच्या पानांना पाण्यासोबत मिक्सरमध्ये वाटावे. २-३ तासांनी तुळशीचा रस प्यावा. यामुळे ताप कमी होण्यास मदत होते.