काय तुमच्या हातून साप मेला किंवा त्याला मरताना पाहिले का?
नागाचा संबंध भगवान शिवशंकराशी आहे. भोलेनाथ या जीवाला आभूषणाच्या रूपात धारण करतात. सृष्टीचे पालनहार भगवान विष्णूही शेषनागाच्या शय्येवर विश्राम करतात.ध्यानात असू द्या की, साप कधीही विनाकारण चावा घेत नाही. चुकून किंवा जाणीवपूर्वक सापाला छेडल्यास तो चावा घेतो. अनेकदा आपण स्वत: साप मारतो किंवा मारले जाताना पाहातो. शास्त्रांनुसार साप मारणे किंवा मारताना पाहाणे पाप आहे.वेद-पुराणांनुसार कोणत्याही जीवाची हत्या करणे किंवा करताना पाहाणे पाप आहे. सापाची हत्या करणा-यास आणि पाहणा-यास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ज्योतिष शास्त्रात कालसर्प योगाची माहिती आहे. या योगाच्या वाईट प्रभावाने माणसाला मरणयातना सहन कराव्या लागतात. चुकून हे पाप आपल्या हातून घडले असल्यास भगवान शिवाची क्षमा मागत सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करा, असे केल्याने नागाला मारण्याच्या पापातून मुक्ती मिळते.