शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2012
Written By वेबदुनिया|

राशिनुसार एप्रिल महिन्याचे भविष्यफल!

WD
मेष
एप्रिल 2012 - नशीब बलवत्तर आहे. नवे वाहन खरेदी करू शकता. प्रेमाच्या दॄष्टीने महिना चांगला आहे. एखाद्या जुन्या मित्राची अचानक भेट होणे शक्य आहे. ही भेट फायदेशीर ठरेल. जुन्या दुर्धर आजारापासून सुटका मिळण्याचा योग आहे. कोणालाही उधार देण्यापासून सावध राहा, नाहीतर ते परत मिळवण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील.

वृष
एप्रिल 2012 - तयार राहा, नशीब आपले दार ठोठावणार आहे. नोकरीत पदोन्नती आणि व्यापारात वृध्दीचे योग आहेत. हिंडण्या-फिरण्याची संधी मिळेल, पण तितकेच थकायलाही होईल. चांगल्या बातमीने मन खुश होईल, पण अधिक भावनिक होऊ नका. विद्यार्थी वर्गाला एकाग्र चित्त होण्यासाठी अतिशय मेहनत करावी लागेल.

मिथु
एप्रिल 2012 - जीवनात काही आश्चर्यकारक घटना घडतील. अशा वेळी आपले मित्र साहाय्यभूत ठरतील. विद्यार्थी वर्गाला आपल्या अभ्यासात अधिक परिश्रम घेणे आवश्यक आहे. कायदेशीर प्रकरणे मनस्ताप देऊ शकतात. प्रॉपर्टीत गुंतवणुक करणे टाळा.

कर्क
एप्रिल 2012 - तुमच्या हुकूमशाही वागण्यामुळे तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागेल. काही नवे सुरू करणे टाळा. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतात. गुंतवणूक करण्याआधी जाणकारांचा सल्ला घ्या

सिं
एप्रिल 2012 - कोणीतरी जुना साथीदार किंवा नातेवाईक सुदैवाने भेटू शकतील. बदलत्या वातावरणाने आजारी पडण्याची लक्षणे आहेत, सावध राहा. चिकित्सकाजवळ जाणे तुमच्यासाठी उत्तम ठरेल. जोडीदाराचे तुमच्याप्रतीचे वागणे साहाय्यकारी असेल. स्पर्धेला घाबरू नका, त्याचा आनंद लुटा. मग पाहा काम करताना किती मजा येते ती. धार्मिक कृत्यांप्रती रूची वाढवा.

कन्य
एप्रिल 2012 - विदेश प्रवासाचा योग आहे. मिळकतीचे नवे मार्ग खुलतील. तुमचे शांत चित्त तुम्हाला अनेक त्रासांपासून वाचवेल. जोडीदाराची साथ मिळेल. अपत्यांकडून चांगली बातमी समजेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागेल.

तू
एप्रिल 2012 - काही लोकं तुमची प्रतिमा खराब करु शकतात. शेजारी तुम्हाला सहकार्य करतील. धनाचे योग सामान्य आहेत. धार्मिक कार्यात वेळ दिल्यामुळे लाभ होईल. आविवाहितांच्या जीवनात प्रेमाची झुळूक येऊ शकते. दान दिल्यामुळे लाभ होईल.

वृश्चि
एप्रिल 2012 - यश टिकवण्यासाठी आळसाचा त्याग करणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात निरसता येत आहे, जोडीदारच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. शत्रू तुमच्या बेजबाबदार वागण्याचा फायदा उचललील. आर्थिक पातळीवरही परिस्थिती सामान्य राहील.

धन
एप्रिल 2012 - विद्यार्थ्यांसाठी चांगली वेळ आहे. मनासारखे फळ मिळेल. शत्रू प्रयत्न करतील, पण त्यांना तुमचे नुकसान करता येणार नाही. नोकरीत परिस्थिती साधारण राहील. तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल, जर तुम्ही त्यासाठी तयार असाल. मित्र मदतीसाठी पुढे येतील.

मक
एप्रिल 2012 - वेळ प्रतिकूल आहे. होणारी कामे बिघडू शकतात. तुम्हाला असे वाटेल की सर्वजण तुमच्या विरोधात आहेत. मित्रांचे वागणेही खटकेल. अपेक्षित फळ न मिळाल्याने विद्यार्थ्यांना निराशा येईल.

कुं
एप्रिल 2012 - कोणीतरी तुम्हाला आपलेपणा दाखवून धोका देण्याच्या विचारात आहे. या महिन्यात मिळकतीचे नवे मार्ग उपलब्ध होतील. नोकरीत प्रगतीचे योग आहेत. काही लोकांसाठी हे मनाजोगे नसेल. जोडीदार मजबूत स्तंभासारखा तुमच्यासोबत उभा ठाकेल.

मी
एप्रिल 2012 - हा महिना तुम्हाला मिळता-जुळता असेल. रागात तुम्ही तुमचेच नुकसान करुन घ्याल. इतर लोक तुमचा राग तुमच्या विरुद्धच हत्यारासारख्या वापरण्याची शक्यतो आहे. कुठलाही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही केलेली घाई-गडबड, नुकसान करू शकते. नोकरीत त्रास होईल. आर्थिक स्तरावर त्रासात राहू शकता, जोडीदाराचे वागणेही तुम्हाला त्रासात टाकू शकते.