व्यापार व्यवसायासाठी शुभ आहे वर्ष 2014
जन्म दिनांकानुसार जाणून घ्या किती शुभ आहे हे वर्ष
अंकशास्त्रानुसार येणारा वर्ष या शताब्दीचा 14वा वर्ष राहणार आहे. 14, 4 + 1 = 5
हा अंक बुधाशी निगडित आहे. बुध ग्रह वणिक आहे म्हणून याचा प्रभाव उद्योग धंद्यावर सर्वाधिक पडतो. जेव्हा वर्षाचा अंक 5 असेल तर नक्कीच भारताचे औद्योगिक क्षेत्रांवर उन्नतीचा प्रभाव बघायला मिळेल. ज्यांची जन्म तारीख 5, 14, 23 असेल त्यांच्यासाठी हा वर्ष फारच लाभदायक ठरेल. प्रतिस्पर्धी परीक्षांमध्ये त्यांना यश मिळेल. जर व्यापार-उद्योगात असाल तर तुम्हाला लाभ होऊन प्रगतीची संधी मिळेल. या तारखेला जन्म झालेल्या पत्रकार, सेल्समॅन, प्रकाशक, लेखक, व्यापारी, विद्यार्थी वर्गासाठी वर्ष 2014 उत्तम असेल. ज्यांची जन्मतारीख 1, 4, 7, 8, 10, 13, 16, 17, 19, 22, 25, 26, 28, 31 आहे, ते देखील वर्ष 14मध्ये यशस्वी होतील. ज्यांच्या प्रत्येक कार्यात बाधा येत असेल, तर ती या वर्षात नक्कीच दूर होईल. अंक 1 सूर्याचा प्रतिनिधित्व करतो, 5चा स्वामी बुधाचा मित्र आहे. तसेच 4 राहूचा प्रतिनिधित्व करतो आणि बुधाच्या राशीत उच्चाचा असतो. 8 शनीचा प्रतिनिधित्व अंक असून तो बुधाचा अतिमित्र आहे. या प्रकारे 1, 4, 8 अंक असणारे लोकांना या वर्षी लाभ मिळेल.तारीख 1, 4, 5, 8, 10, 13, 14, 17, 19, 22, 23, 26, 28, 31 तारखांना ज्यांनी जन्म घेतला आहे, त्यांचे ह्या वर्षी लग्न जुळू शकतात. संतान प्राप्ती होईल. जर बेरोजगार असतील तर प्रयत्न केल्याने त्यांना नक्कीच यश मिळेल. व्यापार-व्यवसायातील निगडित लोकांची प्रगती होईल.