शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2014
Written By
Last Modified: सोमवार, 14 एप्रिल 2014 (10:47 IST)

साप्ताहिक भविष्यफल दि. १३ ते १९ एप्रिल २0१४

मेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्य चांगले राहील व आरोग्याच्या सर्व समस्या मिटण्याच्या मार्गावर राहतील. विरोधक मंडळीचा ससेमिरा व त्रास काही प्रमामात दूर होऊन विरोधक मंडळी गुप्तरीतीने सहकार्य करतील. अंतिम चरणात भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहील. नवीन भागीदारी प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार व स्वीकार जरूर जरूर करावा. भावी काळासाठी तो विशेष लाभप्रदच ठरू शकेल.

वृषभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात संततीबाबत आनंद वार्ता व समाचार हाती येतील. आर्थिक आवक समाधानकारकरीत्या राहून हातात पैसा खेळता राहू शकेल व सर्वत्र यश समोर दिसू लागेल. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे भेटीयोग जुळून येतील. अंतिम चरणात कार्य सभोतालीन परिस्थिती चांगली राहून आरोग्याच्या जुन्या समस्या मिटतील. विरोधक मंडळीचा आक्रमकपणा काही प्रमाणात कमी होऊन यशस्वीतेचा मार्ग खुलाच राहू शकेल.

मिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात कौटुंबिक समस्या मिटतील व पारिवारीक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील. दीर्घकालपर्यंत स्मरणात राहील अशी एखादी घटना घडून येईल. सर्वत्र अपेक्षेप्रमाणे यश दृष्टिक्षेपात ठेवणारी ग्रहस्थिती आहे. अंतिम चरणात स्पर्धा परीक्षेमधील निकाल समाधानकारकरीत्या हाती येईल. संततीबाबत असणार्‍या सर्व समस्या व प्रश्न समाधानकारकरीतीने सुटतील. सर्वत्र परिस्थिथी सर्वसाधारणपणे राहील.

कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रातील वर्चस्व कायम राहील. कार्य सभोतालीन परिस्थिती चांगली राहील. त्यामुळे कोणतेही काम सहसा अपूर्ण किंवा स्थगितीच्या मार्गावर राहणार नाही व यश दृष्टिक्षेपात राहील. अंतिम चरणात कौटुंबिक सदस्यांबरोबर असणारे मतभेद मिटतील. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे मनोनुकूल स्वरुपाचे दूरध्वनी येतील. मनावर असलेले काळजीचे सावट व दडपण दूर होऊन उत्साह वाढीस लागेल.

सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक चढ-उतार राहील. इतरांकडून येणारा पैसा अनिश्‍चित राहण्याची दाट शक्यता आहे. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास असर्मथ राहतील. शांतता व संयमाचे धोरण ठेवणेच उचित ठरू शकेल. अंतिम चरणात सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करण्यास तत्पर राहतील. कार्य क्षेत्रात आपल्या हातून मानसन्मानजनक कामगिरी घडून येईल. मानसिक शांतता व समाधान लाभेल व यशाचा मार्ग खुलेल.

कन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात विविध प्रकारच्या आनंदवार्ता व समाचार हाती येतील. महत्त्वपूर्ण स्वरुपाच्या कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधक स्वरूपाचा ठरेल व काळजीचे सावट दूर होऊन उत्साहवर्धक स्थिती प्रस्थापित होईल. अंतिम चरणात आर्थिक आवक मंदावेल व कर्ज व्यवहार प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत राहतील. कोणत्याही वस्तुस्थितीचा आढावा घेऊनच अंतिम निर्णय घेणे चांगले ठरेल व भावी काळात होणारा मनस्ताप टळू शकेल.

तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात अनावश्यक खर्च वाढेल. इतरांनी दिलेले आर्थिक मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास असर्मथ राहतील. कोणत्याही बाबतीत शक्यतो इतरांवर अधिक विश्‍वासून राहणे अहितकारक ठरू शकेल व अडचणी वाढतील. अंतिम चरणात मनाला दिलासा मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. महत्त्वपूर्ण स्वरुपाच्या घटना व घडामोडी मनोनुकूल स्वरुपाच्या घडतील. दूर गेलेले यश पुन्हा जवळ येऊन उत्साह वाढेल.

वृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक समाधानकारक स्थितीत राहून आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही. अचानक धनलाभ योग आहे. लॉटरी वगैरेसारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकुल आहे. त्यामुळे सावधानता ठेवून वाटचाल करणे आवश्यक व उचित ठरेल. होणारा मनस्ताप काही प्रमाणात टळून शांतता प्रस्थापित स्वरुपातच राहू शकेल.

धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योगक्षेत्र आघाडीवर राहील व व्यावसायिक करार व्यवहार भावी काळाच्या दृष्टीने लाभदायक स्वरुपाचाच ठरेल. आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी सिद्ध होऊन उत्साह वाढेल. अंतिम चरणात चौफेर यशाचा मार्ग खुलाच राहून अपयशाचा सामना करावा लागणार नाही. अल्पशा प्रयत्नाने सहजरीत्या केलेले प्रय▪यशस्वी ठरतील व मनावर असलेले काळजीचे सावट दूर होऊन मानसिक आनंद वाढेल.

मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात धार्मिक स्वरुपाचा प्रवासयोग घडेल व प्रवास कार्यसाधक ठरेल. सर्वत्र नशिबाची साथ पाठीमागे राहील. सहज केलेले प्रयत्न यशस्वीतेकडे घोडदौड करणारेच ठरतील. मानसिक समाधान लाभेल. अंतिम चरणात नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहून वरिष्ठांनी आपल्यावर सोपविलेली कामगिरी आपल्या हातून यशस्वीरीत्या पूर्ण होईल. कार्यक्षेत्रात जे कार्य इतरांना शक्य झाले नाही ते कार्य आपल्या हातून पूर्ण होईल.

कुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात वाहनपिडा योग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना सर्व रस्ता आपलाच आहे, असे समजून वाहन चालविणे धोकादायक स्वरुपाचे ठरू शकेल. शांतता ठेवणेच उचित राहील व होणारा मनस्ताप टळेल. अंतिम चरणात यशाचा मार्ग खुलाच राहील. विविध कामांच्या बाबतीत करावा लागणारा प्रवास यश मिळवून देणाराच ठरेल. कार्य सभोतालीन परिस्थिती अनुकूल व चांगली राहून स्थगित व्यवहार सुरळीत होतील.

मीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीमधून चांगला लाभ घडेल. भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीत राहील. भागीदारीत असणारे वाद मिटण्याच्या मार्गावर राहू शकतील व अपेक्षेप्रमाणे यश मिळेल व शांतता टिकून राहील. अंतिम चरणात महत्त्वपूर्ण स्वरुपाच्या कामासाठी विलंब अडथळे निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. कोणत्याही बाबतीत इतरांचा सल्ला व मार्गदर्शन फक्त ऐकण्यापुरतेच र्मयादित ठेवणे उचित ठरेल व होणारा मनस्ताप टळू शकेल.