19 तारखेला जन्म घेणार्या व्यक्तीचा मूलक 1+9 = 10 अर्थात 1 असेल. तुम्ही राजसी प्रवृत्तीचे आहात. तुम्हाला तुमच्यावर कुठल्याही प्रकारचे शासन पसंत पडत नाही. तुम्ही निडर आणि जिज्ञासु आहात. तुमचा मूलक सूर्य ग्रहाद्वारे संचालित होतो. तुम्ही फारच महत्वाकांक्षी आहात. तुमची मानसिक शक्ति प्रबल असेल. तुम्हाला समजूण घेणे फारच अवघड असते. तुम्ही आशावादी असल्यामुळे प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम असता. तुम्ही सौन्दर्यप्रेमी आहात. तुम्ही आत्मविश्वासी असल्यामुळे प्रत्यके अडचणींना मात करू शकता.