मेष : आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. व्यवसाय वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने नवीन ओळखींचा फायदा करुन घ्याल. आपल्या वृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. आठवड्याच्या सुरुवातीला घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता नवीन खरेदीचे बेत आखले जातील. गृहसुशोभिकरणासाठी शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल. घरातील दुर्लक्षित कामांना वेळ देता येईल. वडीलोपार्जित मालमत्तेतून लाभ होतील. आपल्या कार्यकौशल्यामुळे कार्यक्षेत्रातून आपली प्रशंसा केली जाईल. कर्जप्रकरणे मंजूर होतील.