शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2015
Written By वेबदुनिया|

सूर्य आणि चंद्र जर एकाच घरात असतील तर....

सूर्य आणि चंद्र कुंडलीत एकाच घरात असतील तर मन आणि आत्मा या दोन्ही गोष्टीवर याचा प्रभाव पडतो. ज्योतिष शास्त्रात सूर्याला आत्मा आणि चंद्राला मनाचा स्वामी मानले गेले आहे. आपल्या आत्म्यावर सूर्याचा विशेष प्रभाव असतो. सूर्य जर अशुभ फळ देणारा असेल तर त्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमजोर होतो. त्याचप्रमाणे चंद्र हा मनावर नियंत्रण ठेवतो. कुंडलीत चंद्र शुभ असेल तर मन मजबूत होते. अशा लोकांची इच्छाशक्ति मजबूत असते.

कुंडलीत सूर्य आणि चंद्र एकाच राशीत असतील तर त्याचा तुमच्या मनावर आणि आत्मविश्वासावर अधिक प्रभाव पडतो. सूर्य हा पापाचा ग्रह आहे. सूर्य आणि चंद्र जेंव्हा एकत्र असतात त्यावेळेस अमावस्या असते. त्यावेळेस या ग्रहांचा आपल्यावर वाईट प्रभाव पडतो.

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पहिल्या घरात सूर्य आणि चंद्र एकत्र असतील तर त्या व्यक्तीला आई, वडिलानकडून सुखाची प्राप्ती होत नाही. त्याला पुत्रप्रेम मिळत नाही तो सदैव निर्धन राहतो.

चंद्र आणि सूर्य चार क्रमांकाच्या घरात असतील तर तो व्यक्ती पुत्र आणि सुखापासून वंचित राहतो. हे लोक गरीब राहतात.

कुंडलीत सातव्या घरात सूर्य आणि चंद्र असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यभर पुत्र आणि स्त्रियांकडून अपमान सहन करावा लागतो.

कुंडलीत दहाव्या घरात सूर्य आणि चंद्र असेल तर तो व्यक्ती शूरवीर, सुंदर शरीर, नेतृत्व क्षमता असलेला असतो.