शुक्रवार, 20 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालगित
Written By वेबदुनिया|

आतुकली-भातुकली

सौ. अर्चना देशपांडे

ND
शाळा संपली, सुटी लागली
मित्र-‍मैत्रिणी जमू लागली
खेळू आतुकली-भातुकली ।
खेळणारी भारीच धीटुकली ।

स्वयंपाक बनवला, रुचकर झाला
ढेकर मात्र मोठा आला
भांडी कुंडी घासली
पितांबरीने चकचकीत झाली

दुपारची कामे उरकून घेतली
उन्हे गेली तिन्हीसांज झाली
पुन्हा स्वयंपाकाची तयारी
कंटाळच आला भारी

नुसतेच केले भात पिठले
कोणाला नाही आवडले
आई-बाबांनी खाल्ले
आमचे पोट भरले.... ।