शुक्रवार, 20 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालगित
Written By वेबदुनिया|

दप्तराचे ओझे

- पंडित हिंगे

ND
त्यांच्या पाठीवरील...
भारंभार दप्तरांचे ओझे पाहून...
मला सहज आठवण झाली....
देशातल्या गिर्यारोहकांची...
हे तर चाललेत शाळेत....
उत्तम अशा ज्ञानार्जनासाठी...
मग एवढे जड ओझे....
सांगा बर पाठीवर कशासाठी.. ?
कुणाला तरी यांची...
भविष्यात दया येईल... ?
पाठीवरचे हे जड ओझे...
सांगा कसे कमी होईल... ?
हे तर देशाचे आधारस्तंभ....
यांची पुढे काय गत होईल... ?