शुक्रवार, 20 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालगित
Written By वेबदुनिया|

बेडूकमामा

पावसाळा आला पाऊस पडू लागला
सगळी जमीन भिजून गेली
जिकडे तिकडे हिरवेगार गवत रुजले
रामजी पाटील शेतात काम करीत होता.

ND
शेताजवळच पाटलाची झोपडी होती.
सायंकाळी पाटील घरी आला.
तो काम करून दमला होता
झोपडीत येताच तो खाटेवर पडून राहिला.

ND
बाहेर पाऊस पडतच होता
झोपडीच्या जवळच तिची तीन पिले होती
पावसामुळे पिलांना आनंद झाला
ती 'डराव डराव' करून ओरडू लागली.

बेडकी म्हणाली,
'बाळांनो, पाटील दमला आहे
तुमचे ओरडणे ऐकून तो रागावेल,
व आपणाला मारेल
यासाठी ओरडू नका.'

ND
दोन पिलांनी आईचे ऐकले
पण तिसरे 'डरांव डरांव' करतच राहिले
पाटलाला ती कटक' आवडली नाही
तो खूप रागावला
आणि इकडे तिकडे पाहू लागला
जवळच एक बेडूक 'डरांव डरांव' करीत आहे,
असे पाटलाला दिसले.

पाटील उठला
बेडकापाशी आला
मग पाटलाने बेडकास पकडले,
व जोराने भिरकावून दिले
बेडूक एक दगडावर आपटला व मेला.