1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 सप्टेंबर 2015 (11:52 IST)

कष्टाची कमाई : बोध कथा

ग्रीसमध्ये हेलाक नावाचा एक धनवान आणि लोभी माणूस राहत होता. आपल्या दुकानावर येणार्‍या प्रत्येक माणसाला ठकवणे त्याचे काम होते. त्यातून तो भरपूर धन जमा करायचा. मात्र ते धन त्याच्याकडे टिकत नसे. हे पाहून त्याची सून त्याला समजवायची की बेइमानीचे पैसे कधीच टिकत नसतात. परंतु हेलाक तिचे कधीच ऐकत नसे. एके दिवशी त्याच्या मनात विचार आला की सून जे म्हणते आहे त्याची परीक्षा घेऊन बघू. त्याने इमानदारीने धन जमा करून त्याचे एक सोन्याचे गंठण बनवले व ते एका कपडय़ात बांधले व त्यावर स्वत:चे नाव टाकून चौकात ठेवून आला. एकाने ते उचलून तळ्यात फेकून दिले. तळ्यातील एका मगरीने ते गिळले. काही दिवसांनी एका
 
मच्छीमाराला जाळ्यात ती मगर सापडली. त्यांनी तिचे पोट फाडले तेव्हा तिच्या पोटात ते गंठण निघाले, मच्छीमारांनी हेलाकचे नाव त्यावर पाहिले व बक्षिसाच्या आशेने गंठण त्याला आणून दिले. आपले सोन्याचे गंठण मिळालेले पाहून तो खूश झाला. त्याचा सुनेच्या बोलण्यावर विश्वास बसला की इमानदारीने मिळवलेले धन कुठेच जात नाही आणि बेइमानीचा पैसा कधीच टिकत नाही. त्याने खूश होऊन त्या मच्छीमारांना बक्षीस दिले.