शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. लव्ह स्टेशन
  4. »
  5. लव्ह शायरी
Written By वेबदुनिया|

असे अचानक

- अमोल कपोले

ND
असे अचानक मनात माझ्या
मोर नाचले जग हे सारे

क्षणात एका नवे भासले
अशी अचानक कळू लागली पाखर वाणी

ND
फुलाफुलांतून स्वरून आली नवीच गाणी
असे अचानक सुरात एका गीत गवसले

अबोलातले अर्थ अनोखे मनात हसले
अशी अचानक अंतरातली ओळख पटली

ND
नवजीवनाची पहाट मजला अशी भेटली
असे अचानक जवळी येता दोघे आपण

मने उमलली गेले सरूनी
अवघे मीपण !